Complaint of discharge of project wastewater into public sewers Dainik Gomantak
गोवा

Goa: सार्वजनिक गटारामध्ये सांडपाणी सोडणाऱ्या प्रवर्तकाविरोधात तक्रार

दैनिक गोमन्तक

दाबोळी: सार्वजनिक गटारात आपल्या आवारातील सांडपाणी प्रक्रिया प्लांटमधील सांडपाणी बिनदिक्कतपणे सोडणाऱ्या दाबोळी येथील एका कमर्शियल व रहिवाशी प्रकल्पा विरोधात तक्रार करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे मालक व प्रवर्तकांविरोधात चिखलीच्या बायो-क्रुसेडर्सने वास्को पोलीस व गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे फौजदारी तक्रार दाखल केली आहे. रविवारी विविध सरकारी यंत्रणेला सुटी असल्याने त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन त्या प्लांटमधील सांडपाणी सार्वजनिक गटारामध्ये सोडण्यात येते, असा दावा तक्रारदारांनी केला.

या प्रकल्पाच्या सांडपाणी प्रक्रिया बाहेर वाहत असलेले चिखली बायो क्रुसेडरचे सदस्य सिरिल फर्नांडिस एडविन मास्कारेन्हस यांनी रविवारी प्लांटमधील सांडपाणी कंपाऊंड भिंतीला जोडलेल्या पाईपमधून पाहिले. त्यांनी या प्रकरणी दखल घेताना ताबडतोब 100 क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली.तेथे आलेल्या 'रोबोट-62' पोलिसांना त्यांनी त्या पाईपमधून सांडपाणी वाहत असल्याचे दाखविले. त्यामुळे सत्यता पटविण्यासाठी पोलीस त्या प्रकल्पाच्या आत गेले. तेथील पाहणीकेल्यानंतर पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना अहवाल दिला.

सिरिल फर्नांडिस यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण अभियंत्यांना फोन करून माहिती देऊन तक्रार केली. फर्नांडिस यांनी व्हिडिओ तयार करून तो त्या अभियंत्याला पाठविला, तो पाहिल्यावर अभियंत्याने पुढील तपासासाठी एक पथक पाठविण्याचे आश्वासन दिले. तसेच तेथील सांडपाण्याचा नमुना गोळा करण्याची विनंती त्या अभियंत्याने फर्नांडिस यांना केली. त्यानुसार फर्नांडिस यांनी तेथील सांडपाण्याचे नमुने गोळा केले.

Complaint of discharge of project wastewater into public sewers

सार्वजनिक गटारामध्ये सोडण्यात येणारे त्या प्लांटमधील सांडपाणी वाहत जाऊन खालच्या बाजूस असलेल्या आसई भागातील नैसर्गिक झऱ्यामध्ये मिसळते. तसेच सांडपाणी भूजलामध्येही मिसळत असल्याने भूजल दूषित होत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला.दुषीत पाण्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडण्याची भीती चिखली बायो क्रुसेडर्स संघटनेने व्यक्त केली आहे.

सांडपाणी उघड्यावर सोडून भू गर्भातील पाण्याचा साठा प्रदूषित करण्यास हातभार लावून लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचवण्याच्या या प्रकारात गुंतलेल्यांविरूध्द कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.त्याचा पिण्यासाठीसुध्दा वापर होत असतो. त्यामुळे त्या महा निवासी प्रकल्पातून उघड्यावर सोडण्यात येणारे पाणी खेचले जाते. गावात त्याचा वापर होतो. तसेच या गावातील पाणी टँकरव्दारे इतर भागात पुरवले जाते. निवासी प्रकल्पाच्या दगडी कुंणातून सुव्यवस्थीतरीत्या या वसाहतीतील सांडपाणी या प्रकल्पाच्या खालील

रस्त्याच्या गटारात सोडण्यात येत आहे. प्रक्रिया केलेले हे सांडपाणी भू गटारातून सोडणे आवश्यकअसताना ते उघड्यावर सोडण्यात येत असल्याने या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. सांडपाणी उघड्यावर सोडण्यात येत असल्याने जवळच्या गावातील पारंपरिक जलस्त्रोत प्रदूषित होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (GSPCB) पर्यावरण अभियंत्यांनी दाबोलिम गावाला भेट दिली आणि सार्वजनिक बांधकाम नाल्यांमध्ये सांडपाणी सोडत असल्याने एका बिल्डरच्या विरोधात चिकालीम बायो-क्रुसेडर्सने केलेल्या तक्रारीनंतर तीन सदस्यीय तज्ञांची टीम. पर्यावरण अभियंता श्री.अश्ले परेरा यांनी दाबोलीम येथील विशाल मार्टजवळील कमर्शियल कम रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समधील डिस्चार्ज साइटची पाहणी केली.

चीकलिम बायो-क्रुसेडर श्री. एडविन मास्करेन्हास यांनी तज्ज्ञ पॅनेलला त्या ठिकाणी घेऊन गेले जेथे सांडपाण्याचे पाणी वाहते आणि आसोई खालच्या चिकालीम पंचायत प्रभागात प्रवेश करते. तज्ञांनी या साइटवर समस्येचे मूल्यांकन केले. त्यानंतर तज्ञ सदर नैसर्गिक वारसा स्थळाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्या परिसरातील स्थानिक रहिवाशांनी टीम सदस्यांना तक्रार करताना अलीकडेच पाण्याचा वास येत असल्याचे सांगितले आणि त्यांना त्यांच्या आरोग्याची भीती वाटत असल्याचे सांगितले. पूर्वी ते न घाबरता झऱ्यातील पाणी सुरक्षितपणे वापरत असत. तथापि, अलीकडेच त्यांनी स्प्रिंगचे पाणी वापरण्यापूर्वी उकळण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले. स्थानिकांनी तज्ञांकडे सांडपाण्याचा पाण्याचा प्रवाह थांबवावा आणि विद्यमान दूषिततेपासून झरे साफ करावेत अशी विनंती केली. अभियंत्यांनी त्यांना समस्या सोडविण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT