Complaint of death of youth due to electric shock in Cuncolim

 

Dainik Gomantak

गोवा

विजेच्या झटक्याने युवकाचा मृत्यू झाल्याची तक्रार

एका लोखंडी तारेवर आपले कपडे वाळत घालत असताना त्याचा स्पर्श वीजवाहिनींना झाला

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: कुंकळ्ळी येथील औद्योगिक वसाहतीत वीजवहिनीच्या (electric shock) स्पर्शाने प्रदीप कुमार या युवकाचा मृत्यू झाल्याची तक्रार कुंकळ्ळी पोलिस स्थानकात नोंद करण्यात आलेली आहे. हे प्रकरण 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता औद्योगिक वसाहतीत घडले होते. यावेळी उपस्थित मयत प्रदीप कुमार याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रदीप हा एका लोखंडी तारेवर आपले कपडे वाळत घालत असताना त्याचा स्पर्श वीजवाहिनींना झाला. त्यानंतर त्याचा वीजवाहिन्यांना स्पर्श झाल्याने तो यात बेशुद्ध पडला.

त्याला फातोर्डा (Fatorda) येथील खासगी इस्पितळात दाखल केले असता तो मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्याचा मृतदेह मडगाव जिल्हा इस्पितळाच्या (Margao Hospital) शवागरात ठेवण्यात आला असून, उत्तरीय तपासणीनंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केपेचे पोलिस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT