Margao News Dainik Gomantak
गोवा

Margao News: बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी सभापतींविरोधात तक्रार

सभापतीसह वनखात्‍याच्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्‍याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News "काणकोण येथे जी बेकायदेशीर वृक्षतोड झाली आहे त्‍यात सभापती रमेश तवडकर यांचा हात असून त्‍यात वन खात्‍याचे अधिकारीही सामील आहेत" अशा आशयाची तक्रार काँग्रेस नेते जनार्दन भंडारी व गोवा फॉरवर्ड नेते विकास भगत यांनी दक्षिण गोवा उप वनपालाकडे केलीय. या प्रकरणी तवडकर व अन्‍य अधिकार्‍यांविरोधात गुन्‍हा नोंद करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

आज मडगाव येथील कार्यालयात भगत व भंडारी यांनी ही तक्रार दिली. काणकोण येथील एका साॅ मिलमध्‍ये मोठ्या प्रमाणावर लाकूड कापले जात असल्‍याचे उघडकीस आल्‍यावर आपण जाऊन तेथे चौकशी केली असता हे लाकूड रमेश तवडकर यांनी आणून ठेवले आहे अशी माहिती तेथील कामगारांनी आपल्‍याला दिली.

या लाकडामध्‍ये सागवान, माट्‍टी सारख्‍या लाकडाचाही समावेश आहे. ही बेकायदेशीर लाकडे त्‍या वखारवाल्‍याला चिरण्‍यासाठी वनखात्‍याच्‍या अधिकार्‍यांनी दबाव आणला होता.

यातून तवडकर यांच्‍यासह वन अधिकार्‍यांचा या प्रकरणात हात असल्‍याचे उघड होत असून याप्रकरणी त्‍यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करुन त्‍यांना त्‍वरित अटक करावी अशी मागणी या तक्रारीत करण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT