Goa News: सांकवाळ घटनेनंतर जलस्रोत अभियंत्यांनी गोमंतकीयांना केलंय 'हे' आवाहन, म्हणाले...

यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास भेट दिली होती.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Congress सांकवाळ येथील घटनेनंतर राज्यात टँकरद्वारा पाणी पुरवठा प्रकरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जलस्रोत विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांची भेट घेतलीय.

यावेळी जलस्रोत विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी गोमंतकीयांना पिण्यासाठी टँकरचे पाणी न वापरण्याचे आवाहन केले.

Goa Congress
गोव्यातील 'हे' गाव वर्षातील 11 महिने असतं पाण्याखाली...

सांकवाळ येथील पाण्याच्या टँकरमध्ये सांडपाणी वाहून नेल्याची घटना उघडकीस आल्यापासून गोव्यात पाणी पुरवठा प्रकरणी चांगलेच वातावरण तापले आहे. या प्रकरणी काँग्रेसचे अमित पाटकर यांनी राज्य सरकारवर घणाघात केला होता.

"मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार लोकांच्या जीवाशी खेळत असून गोव्यातील नागरिकांच्या जगण्याच्या हक्काचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत," असा आरोपही अमित पाटकर यांनी केला होता.

Goa Congress
Goa University Exam: बी.कॉम. तिसऱ्या वर्षाचा पेपर पुढे ढकलला; आता 'या' तारखेला होणार

यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास भेट दिली होती. त्यावेळी राज्यात 80 एमएलडी पाण्याचा तुटवडा असून या तुटवड्यामुळेच जनतेला टँकरच्‍या पाण्‍यावर अवलंबून राहावे लागते असे अधिकाऱ्यांनी कबूल केले होते.

आणि आता जलस्रोत विभागाचे प्रमोद बदामी यांनी गोवासियांना पिण्यासाठी टँकरचे पाणी न वापरण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Black And White Podcast With Amit Patkar
Goa Forward Congress Merger Proposal
Goa Assembly Election
Margao Stray Dogs Survey
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com