Competitors from Maharashtra enter fishing competition in Goa for first time Dainik Gomantak
गोवा

गोवा फिशींग स्पर्धेत पहिल्यांदाच महाराष्ट्रातील स्पर्धक दाखल

फिशिंग स्पर्धेत मांडवीकाठी तरूण-तरूणींची झुंबड

दैनिक गोमन्तक

पणजी: जुन्या सचिवालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या 14 व्या फिशिंग स्पर्धेत काल रविवारी तरूण-तरूणींची झुंबड उडाली होती. सुमारे 165 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेत गळाद्वारे मासे पकडण्याचा अभूतपूर्व अनुभव घेतला. विशेष म्हणजे यंदाच्या स्पर्धेत पाच वर्षांच्या दोन मुलांनी विशेष प्राविण्य दाखविले.

दिवंगत वालिरिओ डिसोझा यांच्या स्मरणार्थ यंदाची 14वी स्पर्धा भरविण्यात आली होती. सकाळी दहा वाजल्यापासून मोठ्या संख्येने तरुण-तरुणी आणि अनुभवी मासेमारांनी त्याठिकाणी गर्दी केली होती. प्रत्येकजन आपल्या गळाला मोठा आणि जास्तीत जास्त मासे लागावेत, यावर भर देऊन उत्स्फूर्त उमेदीने वारंवार मांडवीच्या डोहात गळ टाकत होता. अनेकांची निराशा झाली तरी, बऱ्याच जणांना यश मिळाले.

या स्पर्धेच्या निमित्ताने जुने सचिवालय ते पाटोच्‍या नव्या पुलापर्यंतच्या दयानंद बांदोडकर मार्गाला जणू यात्रेचे स्वरूप आले होते. यावेळी पारितोषीक वितरण सोहळ्याला सतीश राजमाळे, टोनी डायस, जेनिफर डिसिल्वा, संजीव सरदेसाई आदी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन युनायटेड फ्रेंड्सचे सॅमी डिसिल्वा, फ्रान्सिस जॉर्ज, पीटर डिसिल्वा यांनी केले होते.

गळ टाकून मासेमारी करणे ही एक विलक्षण कला आहे. इतर कलांप्रमाणेच त्‍यातही प्राविण्य आवश्‍यक आहे. पाण्याचा वेग, दाब यांचे निरिक्षक करण्याची क्षमता आसायला हवी. यंदाचा उत्‍साह पाहता खरंतर ही स्पर्धा वेगवेगळ्या गटात भरविली जावी. ज्यात देशभरातून स्पर्धक सहभागी होतील, गोव्याचा पर्यटन, निसर्ग आणि सापत्यकला यापुरता असलेला नावलौकीक आळखी वाढेल.

- संजीव सरदेसाई

कोल्हापूर-रत्नागिरीचे स्पर्धक

यंदाच्या स्पर्धेला पहिल्यांदाच कोल्हापूर आणि रत्नागिरी येथून स्पर्धक दाखल झाले होते. विशेष म्हणजे रत्नागिरीच्या प्रियेश दीपक मुरकर याने दुसरा क्रमांक पटकावला. यावेळी आयोजकांनी दोन्‍ही ठिकाणाच्या तरुणांचा विशेष सन्मान केला. आवघ्या 14 वर्षात स्पर्धेचा लौकीक राज्याबाहेर गेल्याबद्दल सॅमी डिसिल्वा यांनी समाधान व्यक्त केले.

विजेते स्पर्धक असे..

स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विशांत वैंगणकर (अस्‍नोडा) यांने तांबुस जातीचा 1.8 किलोचा मासा पकडला. द्वितीय क्रमांक प्रियेश मुरकर (रत्नागिरी), तृतीय क्रमांक ताळेगावचा एडिसन फर्नांडिस तर चतुर्थ क्रमांक म्हापशाचा रूपेश नाईक याने पटकाविला. पाच वर्षांचा मेरशी येथील नेल्सन डायस आणि आर्यन नंदीश गोसावी या दोघांचा विशेष सन्मान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT