Mopa Primary School  Dainik Gomantak
गोवा

Mopa: छप्पर उडालेल्या मोडक्या शाळेचे नवे रूप; लोकवर्गणीतून उभारणी

Mopa Primary School: ग्रामपंचायतीने व अन्य शासकीय यंत्रणांनी मोलाचे सहकार्य केल्याने जीर्ण शाळा जणू शून्यातून उभी राहिली

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: गोव्यातील अनेक प्राथमिक शाळा बंद पडल्या, काही एकशिक्षकी बनल्या, अनेक मोडकळीस आल्या आणि काही जमीनदोस्तही झाल्या. राज्यात विशेषत: खेडोपाडी आणि मराठी शाळांच्या बाबतीत असे नकारात्मक वातावरण असताना साठ वर्षांपूर्वी बांधलेल्या आणि नंतर बंद पडून मोडकळीस आलेल्या, छप्पर उडालेल्या मोडक्या शाळेला नवे रूप देण्यात आले आहे.

मोपाचे माजी सरपंच तथा मोपा प्राथमिक शाळा पालक-शिक्षक समिती अध्यक्ष रूपेश परब यांनी समविचारी ग्रामस्थांच्या सहकार्यातून या शाळेची पुनर्बांधणी करून राज्यात नवा आदर्श घालून देण्याचे काम केले आहे.

१९६५च्या सुमारास मोपासारख्या दुर्गम खेड्यात शाळा बांधण्यात आली. एक प्रशस्त खोली, व्हरांडा, स्वतंत्र बाथरूम आणि शौचालय असे त्या शाळेचे स्वरूप होते. काही वर्षांनंतर शाळेच्या शेजारी खाण सुरू झाली आणि सुरूंगाचे धक्के बसू लागल्याने या शाळेला कुलूप लागले.

कालांतराने शाळेची कौले, दरवाजे आणि खिडक्या गायब झाल्या. केवळ भिंती राहिल्या. मूळ बांधकाम चांगल्या दर्जाचे असल्याने ६० वर्षांनंतरही भिंती भक्कमपणे उभ्या आहेत. ही शाळा बंद झाल्याने वरचा गावठणवाडा येथे नवीन प्राथमिक शाळा बांधण्यात आली. जुनी शाळा त्याच अवस्थेत राहिली.

माजी सरपंच रूपेश परब यांनी या इमारतीची पुन्हा उभारणी करण्याचा चंग बांधला. सर्व सरकारी सोपस्कार पूर्ण करून जुन्या शाळेची दुरुस्ती सुरू झाली. यासाठी मोपा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेखर परब, सामाजिक कार्यकर्त्या क्रांती मोपकर आणि अनेक ग्रामस्थांनी सहकार्य केले. ग्रामपंचायतीने व अन्य शासकीय यंत्रणांनी मोलाचे सहकार्य केल्याने जीर्ण शाळा जणू शून्यातून उभी राहिली.

दानशुरांकडून सहकार्याची गरज

दोन महिन्यांपूर्वी या पडिक शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. आज शाळेवर कौलारू छप्पर आले आहे. जुन्या भिंतींना प्लास्टर, इमारतीला रंगरंगोटी करून नवे रूप देण्यात आले आहे. आतील खोलीला आकर्षक टाईल्स बसवण्यात आल्या असून अजूनही काही काम बाकी आहे. या कामासाठी पैशांची गरज आहे. दानशूर व्यक्ती अथवा संस्था पुढे आल्यास ही कामेदेखील मार्गी लागतील, अशी अपेक्षा रूपेश परब आणि सहकाऱ्यांनी व्यक्त केली .

गावातील जुनी शाळा पुन्हा उभी करायची, असे अनेक वर्षांचे स्वप्न होते. देवाच्या कृपाशीर्वादाने आज जुन्या शाळेला नवे रूप प्राप्त झाले आहे. यासाठी शिक्षण खात्याचे अर्थात अनेक अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हितचिंतक व गावातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिला.
रूपेश परब, माजी सरपंच, तांबोसे-मोप-उगवे ग्रामपंचायत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT