Shashi Tharoor Goa Speech Twitter
गोवा

Shashi Tharoor In Goa: भाजपमधील ताकदवानांकडून लोकशाही मूल्ये हायजॅक केली जाताहेत; शशी थरूर

Shashi Tharoor Speech In Goa: भारताची सर्वसमावेशकतेची मूल्ये सांभाळून ठेवणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य मानून ते जोपासण्यासाठी सर्वतोपरी देशातील विचारवंतांच्या गटाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे थरूर म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Shahshi Tharoor Speech In Margao Goa

मडगाव: सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि धोरणे आखताना सर्वांची मते आजमावणारा देश, अशी ख्याती असलेल्या भारताला एकदा काही सांप्रदायिक विचारसरणीमुळे भौगोलिक फाळणीला सामोरे जावे लागले. आताही अशीच सांप्रदायिक विचारसरणी डोके वर काढू पाहत आहे. त्यात ते यशस्वी ठरल्यास भारतीय आत्म्याचीच फाळणी होण्याची शक्यता माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी व्यक्त केली.

विचारवंत आणि साहित्यिक दत्ता दामोदर नायक यांनी वयाची सत्तरी पूर्ण केल्यामुळे गोव्यातील नागरी संघटनांकडून त्यांचा आज मडगाव येथे थरूर यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांचे ‘भारताच्या कल्पना’ या विषयावर व्याख्यान झाले.

देशातील वेगवेगळ्या संस्कृती आणि चालीरीती यांच्या संगमातून तयार झालेला भारत, हे खरे तर एक साहस म्हणावे लागेल.

मात्र, आताची स्थिती पाहिल्यास शासनकर्ते हे साहस तसेच कायम ठेवू शकणार का, अशी भीती निर्माण झाली आहे. तरीही आम्ही आशा सोडता कामा नये. भारताची सर्वसमावेशकतेची मूल्ये सांभाळून ठेवणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य मानून ते जोपासण्यासाठी सर्वतोपरी देशातील विचारवंतांच्या गटाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे थरूर म्हणाले.

थरूर म्हणाले की, पूर्वी भारतात राहणारे हिंदू, मुस्लिम यांना अरब आणि इतर लोक हिंदुस्थानी म्हणून ओळखत होते. हे सर्व विविध धर्माचे, वंशाचे लोक ‘हिंदुस्थानी’ नावाने एकत्र आले. प्राचीन भारतात बहुसंख्य आणि अल्पसंख्याक समुदायांच्या मतांना धोरणे बनविण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात महत्त्व दिले जात होते.

थरूर म्हणाले की, भारत हा अनेकांचा देश आहे. लोकशाहीत प्रत्येक गोष्टीवर सहमती असण्याची गरज नसते, तर काही गोष्टींवर असहमतही असू शकते. मात्र, शासनकर्त्यांचा त्यावर विश्वास नसल्याने वेगळे मत व्यक्त करणारे विचारवंत आणि प्रसारमाध्यमे यांच्यावर नियंत्रण आणणे सुरू झाले आहे. भाजपमधील ताकदवानांकडून लोकशाही मूल्ये हायजॅक केली जात आहेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

भाजपच्या राजवटीत व्यक्तिस्वातंत्र्य हनन

थरूर म्हणाले की, लोकशाहीत बहुमताचा आदेश तात्पुरता असतो; पण एकाधिकारशाही गाजवू पाहणाऱ्या काहीजणांना त्याचा विसर पडला आहे. भारतीयांचे हक्क राजकीय बहुमत हिरावून घेऊ शकत नाही. सध्या भाजप सरकारच्या काळात व्यक्तिस्वातंत्र्याचे हनन झाले आहे.

‘बहुसंख्याकता’ हाच भारताचा आत्मा

संस्कृती, धर्म, भाषा आणि विविधता असलेला भारताशिवाय दुसरा देश नाही. हे लक्षात घेऊन भारताने बहुपक्षीय लोकशाही निवडली. भारत हा केवळ एक देश नाही. भारतीय मनावर संस्कृती, धर्म, वसाहतवादी नियमांचा प्रभाव आहे. त्यामुळे भारतात बहुसंख्याकता दिसून येते आणि हाच खरा भारताचा आत्मा आहे, असे थरूर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT