Goa Fish: व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असलेल्या चविष्ट ‘चणक’ (सीबास) माशाला गोव्यात मोठी मागणी आहे. काही लोक तर या माशावर अक्षरश: तुटून पडतात. पॉलिकल्चर आणि शाश्वत पद्धतीने शेती केल्यास या मासळीच्या उत्पादनात व उत्पन्नात वाढ होते, अशी माहिती (आयसीएआर) केंद्रीय कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ त्रिवेश मयेकर यांनी दिली.
भूभागाच्या तुलनात्मक दृष्टीने मोठी लोकसंख्या, वाढता पर्यटन व्यवसाय, मच्छीमारीतून मिळणारे कमी उत्पादन यामुळे गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन अनिवार्य बनत आहे. यातही आधुनिक तंत्राद्वारे मत्स्योत्पादन केल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना नक्कीच होईल, असे मयेकर म्हणाले.
जुने गोवे येथील कृषी संशोधन केंद्रात गेल्या दोन वर्षांपासून अधिक काळ चणक च्या उत्पादनावर प्रयोग केले जात आहेत. त्यास चांगले रिझल्ट्स मिळालेत. पश्चिम किनारपट्टीतील सर्वच राज्यांमध्ये चणक मासा मिळतो. मुबलक मांस, कमी काटे,रुचकर चव यामुळे या माशाला मोठी मागणी आहे.
काय आहे पॉलिकल्चर मत्स्यशेती?
पारंपरिक तलावांमध्ये तिलापिया (लहान देशी मासा) कटला, रोहू ,कॉमन क्रॉप आदी मासे सोडले जातात. त्यातच चणक मासा वाढविला जातो. चणक मांसाहारी असल्याने कृत्रिम खाद्याऐवजी त्याला हे छोटे मासे मिळतात आणि त्याची नैसर्गिक वाढ चांगली होते. त्यामुळे कृत्रिम खाद्यासाठी लागणारा खर्च वाचतो, माशाची वाढ चांगली होते आणि चवही वाढते असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
कोळंबीला चांगला पर्याय उपलब्ध
माशांमध्ये कोळंबीला मोठी मागणी असते. यासाठी पारंपरिक मत्स्योत्पादक कोळंबीला प्राधान्य देतात. मात्र एकूण उत्पादनाच्या दृष्टिकोनातून चणक मासा कोळंबीला चांगला पर्याय आहे. योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास चणक 4 किलोपर्यंत वाढतो आणि त्याची बाजारातील किंमत दोन ते अडीच हजारापर्यंत मिळते. इतके उत्पन्न कोळंबीमधून मिळत नाही.
त्रिवेश मयेकर, शास्त्रज्ञ-
भूभागाच्या तुलनेने मोठी लोकसंख्या, वाढता पर्यटन व्यवसाय, सागरी मच्छीमारीतून मिळणारे कमी उत्पादन (कॅच) यामुळे गोड्या जलस्त्रोतांचा मत्स्योत्पादनासाठी उपयोग अनिवार्य बनत आहे. यातही आधुनिक पॉलिकल्चर तंत्राद्वारे मत्स्य उत्पादन केल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.