Goan Students Returned from Ukraine Dainik Gomantak
गोवा

युक्रेनमधून येताना अनेस्का फर्नांडिसला थंडीत आठ किलोमीटरची पायपीट

अनेस्काने कथन केली ‘आप बीती’: अनेक अडथळ्यांनंतर पोहोचली सुखरूप मायभूमीत

दैनिक गोमन्तक

मडगाव: युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांना कोणकोणती संकटे आणि दिव्‍यांना तोंड द्यावे लागले, याची ‘आप बीती’ आज मडगावात पोहोचलेल्या अनेस्का फर्नांडिस हिने सांगितली. बॉम्ब वर्षावातून स्वतःला वाचविण्यासाठी अनेस्काने तीन दिवस बंकरमध्ये आसरा घेतला होता. युक्रेनची सीमा ओलांडण्यासाठी तिला तब्बल 10 अंश सेल्सियस तापमान असलेल्या भागातून कडाक्याच्या थंडीत रात्रीच्या वेळी आठ किलोमीटर पायपीट करावी लागली.

युक्रेनच्या युद्धभूमीवर अडकून पडलेली बोर्डा येथील अनेस्का आज आपल्या घरी पोहोचली खरी; मात्र त्यासाठी तिला अनेक दिव्यांमधून जावे लागले. युक्रेन सोडण्याआधी कडाक्याच्या थंडीत पूर्ण रात्र तिला उघड्यावर कुडकुडत काढावी लागली.

अनेस्का आज दुपारी तिच्या घरी पोहोचली आणि तिच्या पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गोव्यात पोहोचण्यापूर्वी तिला बॉम्बवर्षाव पाहण्यासह अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. बॉम्बवर्षाव सुरू असतानाही अनेस्का आणि तिच्या मैत्रिणींनी मोठ्या कष्टाने रोमेनिया गाठले. मंगळवारी रात्री त्यांनी भारतात येण्यासाठी विमान पकडले. बॉम्ब वर्षाव होताना त्यांनी बंकरचा आश्रय घेतला.

जेडनला आणण्यासाठी प्रयत्न : चार गोमंतकीय विद्यार्थिनी हंगेरीला पोहोचल्या आहेत. खार्किव्ह शहरात अडकलेल्या दोन विद्यार्थिनी लिव्ह शहरात जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसल्या असून सुमी शहरात अडकलेला बाणावली येथील जेडन परेरा यालाही बाहेर काढण्याचे प्रयत्न भारतीय दूतावासाद्वारे सुरू आहेत.

आणखी दोघे परतणार

फोंडा येथील कॅरन फर्नांडिस ही विद्यार्थिनीही आज गोव्यात पोहोचली. ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत तिला युक्रेनमधून आणण्यात आले. एनआरआय खात्याचे संचालक अँथनी डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणावली येथील जोलिफा गोएस आणि दाबोळी येथील मिहीर देशपांडे हे दोन अन्य गोमंतकीय विद्यार्थी रोमेनियातून येण्यासाठी विमानात बसले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT