नार्वे पंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती

सरपंच, उपसरपंचपद रिक्त झाल्याने प्रशासकाची नियुक्ती
Norwegian Panchayat
Norwegian Panchayatdainikgomantak
Published on
Updated on

डिचोली : सध्या राज्यात पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच, डिचोलीतील नार्वे पंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती सोपवण्यात आला आहे. या पंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचपद रिक्त झाल्याने अखेर या पंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

डिचोली गट विकास कार्यालयातील अधिकारी बी. महाले यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या जून महिन्यात पंचायत निवडणुका होणार असल्याने नार्वे पंचायतीच्या सरपंच पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता जवळपास मावळल्यातच जमा आहे. त्यामुळे विद्यमान पंचायत मंडळाची मुदत संपेपर्यंत तरी नार्वे पंचायतीवर प्रशासकाचा ताबा कायम राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. (Appointment of Administrator on Norwegian Panchayat)

Norwegian Panchayat
...तर मगोपचं आम्ही स्वागतचं करू; सदानंद तानावडे

दरम्यान, सरपंचपद रिक्त असताना उपसरपंचांनी राजीनामा देण्याच्या प्रकारामुळे गावात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यामागे राजकारण (Politics) असल्याचीही चर्चा सुरु आहे. विद्यमान पंच प्रतिष्ठा मिशाळ यांनी तर या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Norwegian Panchayat
घर घेण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्या कामाची

सरपंच, उपसरपंचपद रिक्त

गेल्या २९ ऑक्टोबर रोजी या पंचायतीच्या सरपंच मनीषा आमोणकर यांची सरपंचपदावरून उचलबांगडी करण्यात आल्यापासून या पंचायतीचे सरपंचपद रिक्त आहे. मध्यंतरी रिक्त सरपंचपदाची निवड करण्यासाठी २३ डिसेंबर रोजी पंचायत मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र त्यावेळी सरपंच निवड झालीच नाही. त्यावेळी नाट्यमय घडामोडी घडल्या. पंचायतीच्या एकूण पाचपैकी चार पंचसदस्य अनुपस्थित राहिल्याने या पंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीची (election) प्रक्रिया त्यावेळी स्थगित ठेवावी लागली. सरपंचपद रिक्त झाल्यानंतर सरपंचपदाचा ताबा उपसरपंच तुकाराम साळगावकर यांच्याकडे होता. मात्र त्यांनीही गेल्या महिन्यात उपसरपंचपदाचा राजीनामा दिला. अखेर पंचायतीला कोणीच वाली नसल्याने पंचायत खात्याने या पंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com