खाद्यतेलात सध्या सूर्यफूल तेलाच्या प्रतिलिटरच्या पिशवीमागे १० रुपयांची घट झाली आहे. दहा पिशव्यांच्या बॉक्समागे १०० रुपये कमी झाल्याने हा बॉक्स १ हजार ५५० वरून १ हजार ४५० रुपयांना मिळत आहे. परंतु सूर्यफूल तेलाच्या नामांकित कंपन्यांचे प्रतिलिटर पिशवीचे दर मात्र १७५ ते २१० रुपयांवर टिकून असल्याचे बाजारात दिसून आले. (Cooking Oil)
सध्या बाजारात सूर्यफूल तेलाचे दर दहा रुपयांनी उतरले असून, अजूनही त्यात घट होण्याची शक्यता आहे. सूर्यफूल पिकाचे उत्पादन काढण्यास सुरुवात होईल, तसे तेलाचे दर खाली येतील. सध्या बाजारात नामांकित तेलाचे दर पावणे दोनशे ते दोनशे रुपयांवर प्रतिपिशवीमागे आकारावे लागतात.
त्याशिवाय सूर्यफूल तेलामध्ये अनेक कंपन्यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे इतर तेलाच्या पिशव्यांपेक्षाही इतर काही कंपन्यांच्या पिशव्या मध्यमवर्गाला परवडणाऱ्या आहेत. त्यामुळेच अशा तेलाची आम्ही मागणी करीत आहोत, अशी माहिती घाऊक व्यापारी धर्मेंद्र भगत यांनी दिली.
पामतेलामध्ये १२० ते १४० रुपयांपर्यंत पोहोचलेली पिशवी आता साधारण ११० रुपयांपर्यंत खाली आली आहे. घाऊक दराने जर पामतेलाची पिशवी खरेदी केल्यास ती ९६ ते ९७ रुपयांना मिळते. त्यासाठी दहा पिशव्यांचा बॉक्स खरेदी करणे अपेक्षित आहे. पामतेलाचे दर आणखी कमी होतील, असे चित्र सध्या बाजारात दिसत आहे.
- धर्मेंद्र भगत, घाऊक व्याप
दर नियंत्रणात आल्याने समाधान
गोव्यात जास्तीत जास्त सूर्यफूल, पामतेल आणि नारळाच्या तेलाचाही वापर स्वयंपाकासाठी केला जातो. तेलाचे दर वाढले की स्वयंपाक घरातील महिलांचे आर्थिक बजेटही बिघडते. सध्या तेलाचे दर नियंत्रणात आल्याचे ते एक समाधानाची बाब म्हणावी लागेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.