Madgaon Express Trailer 
गोवा

Madgaon Express Trailer: गोवा ट्रीप, ट्रॅप आणि ड्रग्ज; धम्माल कॉमेडी मडगाव एक्सप्रेसचा ट्रेलर प्रदर्शित

Madgaon Express Trailer:मडगाव एक्स्प्रेस असे या चित्रपटाचे नाव असून, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Pramod Yadav

Madgaon Express Trailer

फुक्रे सारख्या उत्तम विनोदी चित्रपटाची फ्रेंचायझी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणारे निर्माते फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी आता नवा कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहेत.

मडगाव एक्स्प्रेस असे या चित्रपटाचे नाव असून, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत आहे. यात प्रतीक गांधी, दिव्येंदू शर्मा आणि अविनाश तिवारी या तीन मित्रांच्या गोव्याच्या ट्रीपची मजेदार कहाणी दाखवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे मडगाव एक्सप्रेस या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल खेमू याने केले आहे. कुणाल पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शित करत आहे.

मडगाव एक्सप्रेसचा ट्रेलर एक्सेल मूव्हीजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये तीन मित्रांची कहाणी दाखवण्यात आली असून, त्यांना गोव्याला जायचे आहे. गोव्यात पोहोचल्यावर ते कसे नवीन संकटात सापडत जातात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

मडगाव एक्सप्रेसमध्ये दिव्येंदू शर्मा, प्रतीक गांधी, अविनाश तिवारी आणि नोरा फतेही यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

मडगाव एक्सप्रेस होळीच्या आसपास मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 22 मार्च रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाची चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली असून ते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT