देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्वच राज्यात उमेदवार निवडीसाठी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची धावपळ सुरु आहे. गोव्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. 2019 च्या निवडणुकीत उत्तरेत भाजप तर दक्षिणेत काँग्रेसने बाजी मारली होती. यावेळी दोन्ही जागांवर दोन्ही पक्ष मजबूत दावा सांगत आहेत. यासाठी उमेदवार निवडीपासून सर्व काळजी घेतली जात आहे.
दरम्यान, INDIA TV-CNX केलेल्या ओपिनियन पोलमध्ये राज्यात कोण बाजी मारणार याबाबत अंदाज वर्तविण्यात आला आहे.
इंडिया टीव्ही-सीएनएक्सने गोव्यात निवडणूक जनमत सर्वेक्षण केले, त्यानुसार यावेळी राज्यात काँग्रेसच्या पदरात निराशा पडण्याची शक्यता आहे. राजकीय जाणकारांचे माते यावेळी राज्यातील दोन्ही जागा भाजप जिंकण्याची शक्यता आहे.
इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलनुसार यावेळी गोव्यातील दोन्ही जागांवर काँग्रेसचा पराभव होऊ शकतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यात भाजपच्या श्रीपाद नाईक यांचा विजय झाला होता तर, दक्षिणेत काँग्रेसच्या फ्रान्सिस सार्दिन यांनी विजय मिळवला होता.
इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलनुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप दोन्ही जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे, तर काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.
दरम्यान, भाजपकडून उत्तर गोव्यात श्रीपाद भाऊंना सलग सहाव्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. उत्तर भाजप एक लाख मतांनी निवडून येईल असा दावा पक्षाचे नेते करत आहेत.
तर, दक्षिणेत अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. यावेळी दक्षिणेत महिला उमेदवार असण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, काही नावं देखील विचाराधीन आहेत.
दुसरीकडे काँग्रेसने आपसोबत जागेचा तिढा सोडवला असला तरी अद्याप त्यांनी एकाही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. काँग्रेस भाजपच्या दक्षिणेतील उमेदवाराची घोषणा केल्यानंतर त्यांचा उमेदवार जाहीर करतील असे सांगितले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.