Mahua Moitra Dainik Gomantak
गोवा

Goa Election: ...तर भाजपविरोधी आघाडीसाठी एकत्र या

तृणमूल कॉंग्रेसने आप आणि कॉंग्रेसला आघाडीसाठी एकत्र येण्याचे 'आवाहन' केले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा तृणमूल कॉंग्रेसच्या प्रभारी आणि खासदार महुआ मोईत्रा यांनी आज कॉंग्रेसला खडे बोल सुनावले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी कॉंग्रेसवर टीकास्त्र चालवले, मात्र त्याच बरोबर भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टीला (AAP) तृणमूल कॉंग्रेस बरोबर येऊन 'भाजपविरोधी' आघाडी स्थापन करण्याचेही आवाहन केले. (Mahua Moitra TMC Goa Election Latest News)

महुआ मोईत्रा म्हणाल्या, "कॉंग्रेस (Congress) एकट्याने ही लढाई लढू शकत नाही. 2017 मध्ये भाजप पेक्षा जास्त जागा जिंकूनही त्यांना सरकार बनवता आले नाही. कॉंग्रेसमध्ये नेत्यांनी प्रवेश केला तर त्यांचं स्वागत केले जाते, मात्र नेते दुसऱ्या पक्षात गेले तर कॉंग्रेस त्यांच्यावर टीका करतो. कॉंग्रेसने दुसऱ्यांना सर्टिफिकेट देणे थांबवावे आणि जागे व्हावे. कॉंग्रेसने त्यांचे कामं केले नाही म्हणून आम्हाला लोकांसाठी पर्याय व्हावं लागतं आहे."

त्यांनी बोलताना ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा भाजपविरोधी आघाडीच्या नेत्या असा उल्लेख केला. आघाडीबद्दल बोलताना त्यांनी आप आणि कॉंग्रेस समोर मैत्रीचा हात पुढे केला. त्या म्हणाल्या, "आम्ही भाजपविरोधी आघाडीसाठी तयार आहोत. राज्यात भाजप विरुद्ध भाजपविरोधी आघाडी अशी लढाई आहे. आप आणि कॉंग्रेसने यामध्ये सामील व्हावे, असेही मोईत्रा पुढे म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT