Lala Ki Basti Goa Dainik Gomantak
गोवा

Lala Ki Basti Goa: 'लाला की बस्ती'तून 96 जणांना अटक; कोलवाळ पोलिसांची भाडेकरुंची तपास मोहीम

Lala Ki Basti Goa: अधिकृत कागदपत्रे पोलिस स्थानकात जमा करायची असतात. मात्र, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याने पोलिसांनी ही कारवाई राबवली.

Manish Jadhav

Lala Ki Basti Goa

वाढत्या चोऱ्या अन् गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कोलवाळ पोलिसांनी गुरुवारी (ता. 23) माडेल-थिवी येथील लाला की बस्ती या परिसरात सकाळच्या सत्रात भाडेकरु पडताळणी मोहीम राबवली.

या मोहिमेदरम्यान सुमारे 97 लोकांची तपासणी केली गेली. यातील 96 जणांकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती. त्यामुळे वरील लोकांना 41 सीआरपीसी अंतर्गत अटक करण्यात आली.

एखाद्या संबंधितास घरमालकांनी भाडेकरू ठेवल्यास त्यांची अधिकृत कागदपत्रे पोलिस स्थानकात जमा करायची असतात. मात्र, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याने पोलिसांनी ही कारवाई राबवली.

दरम्यान, पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम हाती घेण्यात आली. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने बिगर गोमंतकीय मजूर वर्गाचा भरणा मोठ्या प्रमाणात येथे होतो. यातील काहींकडे आवश्यक कागदपत्रे वैगेरे नसतात.

तसेच, अनेकदा अशा लोकांचा चोरी आणि इतर गुन्ह्यांत समावेश असतो, असे पोलिस आकडेवारीतून वारंवार ही घडकीस आले आहे. हे मजूर मिळेल तिथे भाडेपट्टीवर राहतात.

याशिवाय, ते एखाद्या गुन्ह्यात सहभागी असल्यास पोलिस त्यांच्या पत्त्यावर माहिती घेण्यास पोहोचेपर्यंत ते अन्यत्र पळून गेलेले असतात. परिणामी पोलिस तपासात आडकाठी येते. त्यामुळे भाडेकरु पडताळणी यासारखी मोहीम गरजेची असते.

वाढत्या गुन्ह्यांमुळे झाडाझडती

पोलिसांकडून वेळोवेळी भाडेकरु पडताळणी अर्ज भरण्याचे आवाहन केले जाते. तसेच, मोहीम तीव्र केली जाते; परंतु काही दिवसांनी पुन्हा ती थंडावते. सध्या चोऱ्या तसेच सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार वाढल्याने ही मोहीम कोलवाळ पोलिसांनी आपल्या हद्दीत राबवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT