Scrap Dump Dainik Gomantak
गोवा

Scrap Dump: कोलवाळ पंचायतीकडून भंगारअड्ड्यांना नोटिसा कारण...

कोलवाळमधील सर्व बेकायदा भंगारअड्ड्यांना सील ठोकण्याची प्रक्रिया सध्या पंचायतीने सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

Scrap Dump Colvale: कोलवाळमधील सर्व बेकायदा भंगारअड्ड्यांना सील ठोकण्याची प्रक्रिया सध्या पंचायतीने सुरू केली आहे. त्यानुसार गावातील एकूण 51 भंगारअड्ड्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. रहिवाशांकडून आलेल्या तक्रारी आणि गावाच्या पर्यावरणीय हानीच्या अनुषंगाने आम्ही हे पाऊल उचलले आहे, अशी माहिती कोलवाळच्या सरपंच शीतल चोडणकर यांनी दिली.

मुशीरवाडा-कोलवाळ येथे नोव्हेंबरमध्ये भंगारअड्ड्याला लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात झालेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत गावातील सर्व भंगारअड्डे सील करण्याचा ठराव मंजूर केला होता.

त्यानुसार पंचायतीने गावातील सर्व भंगारअड्ड्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. पंचायतीच्या पूर्वपरवानगीशिवाय भंगार हाताळण्याचा धंदा चालविला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा बेकायदा व्यवसाय चालविल्याबद्दल परिसर सील का करू नये, अशा आशयाची ही नोटीस पंचायतीने भंगारअड्ड्यांच्या मालकांना बजावली आहे.

लेखी उत्तरासह हजर राहावे

सात दिवसांच्या आत कार्यालयीन वेळेत लेखी उत्तरासह वैयक्तिक सुनावणीला हजर राहावे, असे निर्देश या नोटिशीतून दिलेत. या काळात आवश्यक कागदपत्रांसह पंचायत कार्यालयात उत्तर सादर न केल्यास या प्रकरणात तुमचे काहीही म्हणणे नसल्याचे समजून पंचायत पुढील कारवाई हाती घेईल.

तसेच पूर्वसूचना न देता पंचायत राज कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात येईल, असे या नोटिशीतून पंचायत सचिवांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT