Colvale jail  Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail : रक्षकाला मारहाण; कोलवाळ कारागृह पुन्हा चर्चेत

कारागृहाच्या जेलरने मद्यधुंद अवस्थेत एका तुरुंग रक्षकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Colvale Jail : कोलवाळ मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले तेथील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील हाणामारीमुळे. कारागृहाच्या जेलरने मद्यधुंद अवस्थेत एका तुरुंग रक्षकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला असला तरी याला दुजोरा मिळालेला नाही. या घटनेनंतर जखमी तुरुंग रक्षकाला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले होते. उपचारानंतर त्याला शनिवारी सकाळी घरी पाठविण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार, सध्या कारागृहात कर्मचारी कमी असल्याने जखमी तुरुंग रक्षक आणि जेलरमध्ये जेल ड्युटीवरून वाद सुरू झाला. यावेळी जेलरने तुरुंग रक्षकाच्या कानशिलात मारली आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नंतर तुरुंग रक्षकानेही जेलरला प्रत्युत्तर दिले असता, जेलरने तुरुंग हवालदार व इतरांना बोलावून तुरुंग रक्षकाला लाठीने बेदम मारहाण केली. यात तुरुंग रक्षक जखमी झाला. नंतर त्याला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले. सहा दिवसांपूर्वीच येथील कैद्यांमध्ये हाणामारी होऊन एका नायजेरियन कैद्याचा कान चावण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी येथील चौदा कैद्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. यापूर्वीही कैद्यांमध्ये जबर हाणामारी तसेच प्राणघातक हल्ल्यांचे प्रकार घडले होते.कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात अशा प्रकारची घटना घडली आहे का, अशी विचारणा केली असता, अशा प्रकारची तक्रार तुरुंग प्रशासनाकडून आमच्याकडे आलेली नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक यांनी दिली.

प्रकरण दडपण्याचा संबंधितांचा प्रयत्न

हा वाद वरिष्ठ पातळीवर पोचल्यावर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी तुरुंग प्रशासन ‘ब्र’ काढण्यास तयार नाही. उलट असे काहीच घडलेच नाही, असे सांगण्यात येत आहे. सध्या कारागृहातील ड्युटीवरून वरचेवर कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. तसेच काहीजणांच्या मर्जीनुसार ड्युटी दिली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT