Colvale Central Jail Security Dainik Gomantak
गोवा

Colvale Central Jail Security: कोलवाळ कारागृहात सध्या चाललेय काय? सुरक्षेचा फज्जा, गुन्हेगारी नेटवर्क जोमाने कार्यरत

Drug Network From Jail: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सध्या सुरक्षा व्यवस्था ढासळल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: चार भिंती आणि सशस्त्र पोलिसांचा चोवीस तास कडेकोट पहारा असलेल्या कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सध्या सुरक्षा व्यवस्था ढासळल्याचे दिसून येत आहे.जुलै २०२६ च्या अखेरीस क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईत एनडीपीएस गुन्ह्यात शिक्षा भोगणारा कैदी अझरुद्दीन आची ऊर्फ ‘असरू’ थेट तुरुंगाच्या आतूनच आंतरराज्यीय ड्रग्ज नेटवर्क चालवत असल्याचे निष्पन्न झाले.

दिल्ली क्राईम ब्रँचच्या मदतीने केलेल्या या कारवाईत ४३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, तुरुंगातून नेटवर्क चालवणाऱ्यांचे धागेदोरे थेट दिल्ली आणि तेलंगणापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. याआधी जानेवारी २०२६ मध्ये टाकलेल्या अचानक छाप्यात कैद्यांच्या खोल्यांमधून ४८ मोबाईल फोन, गांजा, चरस, ब्लूटूथ इअरबड्स व पॉवर बँक्स जप्त करण्यात आल्या होत्या.

या घटनांमुळे कारागृह प्रशासन गुन्हेगारांसमोर हतबल झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे, कोलवाळ मध्यवर्ती कारागृह हे केवळ कैद्यांचे तळ राहिले नसून, ते गुन्हेगारी नेटवर्क आणि अमली पदार्थांच्या आंतरराज्यीय सिंडिकेटचे एकप्रकारे ‘कंट्रोल रूम’ बनल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. जून २०२६ मध्ये अटक करण्यात आलेल्या अभिराम पुलिक्कल याच्या मोबाईलच्या तांत्रिक तपासणीतून अझरुद्दीन आणि त्याच्या दिल्लीतील साथीदारांचा धागेदोरा पोलिसांच्या हाती लागला.

या तपासाच्या आधारे दिल्लीत टाकलेल्या छाप्यात मेथाम्फेटामाईन आणि मॅजिक मशरूम्स असा सुमारे ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पाचहून अधिक जणांना गजाआड करण्यात आले आहे. क्राईम ब्रँचच्या तपासात आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. देशातील अनेक राज्यांत गुन्हे करून फरार होणाऱ्या बांगलादेशी दरोडेखोरांच्या टोळीने कोलवाळ कारागृहात असतानाच आपले नवे नेटवर्क तयार केले होते.

याशिवाय, कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा असतानाही कैद्यांकडून चपलांमध्ये लपवून गांजा तस्करी करण्याचे प्रयत्न, छाप्यांमध्ये जप्त झालेले ४० हून अधिक मोबाईल फोन व सिम कार्ड, तसेच कारागृहाच्या आत चालणाऱ्या अवैध वस्तूंच्या व्यवहारामुळे सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वारंवार होणारे वादविवाद, मारामारी, सुरक्षेतील त्रुटींमुळे होणाऱ्या चौकशा आणि कैद्यांच्या वाढत्या बेकायदेशीर हालचालींमुळे कारागृह प्रशासन व कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला आहे.कारागृहातील अंडरट्रायल कैद्यांनी सॅनिटायझर पिऊन किंवा स्वतःला इजा करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सुरक्षेतील त्रुटींमुळे होणाऱ्या सततच्या कारवाया आणि उच्च अधिकाऱ्यांच्या दबावाचा कथित सामना जेलर व कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.

‘ड्रग्ज स्कँडल’मधून सुरक्षेतील गंभीर त्रुटी उघड

कोलवाळ कारागृहात वर्ष २०२५ च्या मध्यावर उघडकीस आलेले ‘ड्रग्ज स्कँडल’ हे सुरक्षेतील त्रुटींचे मोठे उदाहरण ठरले. कारागृहाच्या आतून अमली पदार्थांचे नेटवर्क चालवले जात असल्याचा खुलासा झाल्यानंतर आणि माध्यमांनी सुरक्षेतील गंभीर त्रुटी उघड केल्यानंतर गृह खात्याने कारवाई केली. कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तब्बल ८१ पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी रिझर्व्ह फोर्समध्ये बदली करण्यात आली.

कैद्यांच्या टोळ्यांमधील मारामाऱ्यांत वाढ

कारागृहातील विविध बराकांमध्ये कैद्यांच्या टोळ्यांमध्ये वर्चस्वावरून होणाऱ्या मारामारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या ऑक्टोबर २०२५ मध्ये कैद्यांच्या एका गटाने एका कैद्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. तर ताज्या घटनेत, जुलै २०२६ मध्ये, एका ब्लॉकमध्ये पूर्ववैमनस्यातून एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर कॅरम बोर्डाने प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यात पीडित कैद्याच्या डोळ्याच्या सॉकेटचे व गालाचे हाड फ्रॅक्चर झाले असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल २०२६ मध्ये कारागृह प्रशासनाने उच्च न्यायालयात कारागृहातील सुरक्षेत सुधारणा करण्याबाबतचा अधिकृत अहवाल सादर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT