Colva Creek Dainik Gomantak
गोवा

Colva Creek: कोलवा खाडी घेणार 'मोकळा श्वास'! गाळ उपसण्याचे काम सुरू; 4 दिवसांत काम हाेणार पूर्ण

Colva Creek Clean Up: कोलवा समुद्र किनाऱ्यानजिक असलेल्या प्रदूषित खाडीतील पालापाचोळा व अन्य कचरा व गाळ उपसण्याचे काम जलस्रोत खात्याने हाती घेतले आहे.

Sameer Panditrao

Colva beach cleaning project

सासष्टी: कोलवा समुद्र किनाऱ्यानजिक असलेल्या प्रदूषित खाडीतील पालापाचोळा व अन्य कचरा व गाळ उपसण्याचे काम जलस्रोत खात्याने हाती घेतले आहे. त्यामुळे या खाडीला आता नवी झळाळी मिळणार आहे.

गेल्या आठवड्यात स्थानिक आमदार वेन्झी व्हिएगश यांनी कोलवाचे सरपंच, पंच तसेच जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत या खाडीची पाहणी केली होती. ही खाडी पूर्ण प्रदूषित झाल्याचे यावेळी निदर्शनास आले होते. तातडीने या खाडीची साफसफाई करावी, असे निर्देश व्हिएगश यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार हे काम हाती घेण्यात आले आहे.

एकाच दिवसात केलेल्या कामामुळे या खाडीतील पाणी काही प्रमाणात स्वच्छ झाले आहे, असे आमदार व्हिएगश यांनी सांगितले. पुढील तीन चार दिवस हे काम चालूच राहील. या खाडीतील सर्व कचरा व गाळ हटवला जाईल असे त्यांनी सांगितले.

खाडी स्वच्छ करण्याची जबाबदारी जलस्रोत खात्याची असून त्यासाठी खर्च सुद्धा जास्त आहे. गेले वर्षभर या संदर्भातील फाइल मंजुरीसाठी जलस्रोत खात्यात पडून आहे, असे व्हिएगश यांनी सांगितले.

आमदार व्हिएगश यांची मंत्री सिक्वेरांवर टीका

आमदार व्हिएगश यांनी पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यावर टीकेची झोड उठवली. खाडी स्वच्छ करण्यासाठी आमदाराने कुठलेही पाऊल उचलले नाही किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संपर्क साधला नाही असे मंत्र्यांनी म्हटले होते. व्हिएगश यांनी सांगितले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाने डिसेंबरमध्ये पाण्याचा नमुने तपासणीसाठी घेतले होते. पण त्यानंतर काहीच केले नाही. मंत्र्यांनी प्रथम वस्तुस्थिती जाणून घ्यावी. तसेच साळ नदी स्वच्छ करण्यासाठी प्रथम त्यांनी पाऊल उचलावीत, असे व्हिएगश यांनी सूचित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT