Colva: चिंताजनक! कोलव्यातील बालोद्यानाच्या शौचालयाचे पाणी खाडीत, ‘जीटीडीसी’ला नोटीस

Colva Creek Pollution: गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. शमिला मोंतेरो यांनी ही नोटीस गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठविली आहे.
Colva Creek Pollution
Colva Creek PollutionCanva
Published on
Updated on

सासष्टी: कोलवा येथील खाडीतील पाण्यात जवळच असलेल्या बालोद्यानातील शौचालयातील सांडपाणी मिसळत असल्याचे दिसून आल्याने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. शमिला मोंतेरो यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सात दिवसांच्या आत या शौचालयाची सुविधा का बंद करू नये किंवा हे शौचालयच पूर्णपणे का बंद करू नये, अशी विचारणा केली आहे.

या खाडीतील पाणी कुठून दुषित होते, याची २० डिसेंबर २०२४ रोजी पाहणी केली होती. खाडीतील पाण्यात फेकल कॉलिफॉर्म आणि ‘बीओडी’ची मात्रा जास्त प्रमाणात आढळली होती.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. शमिला मोंतेरो यांनी ही नोटीस गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठविली आहे. या नोटिसीला पूरक उत्तर दिले नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही बजावले आहे. या खाडीत सांडपाणी मिसळत असल्याने गेले दशकभर समाजसेवक ज्युडीथ आल्मेदा हे उच्च न्यायालयात लढा देत आहेत. कोलव्यातील सर्वच खासगी आस्थापनांची सांडपाणी जोडणी कोलवा सांडपाणी प्रक्रिया प्लांटला जोडण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Colva Creek Pollution
Colva Beach: कोलवा किनाऱ्यावर ‘जिओ बॅग तंत्रज्ञान’ कार्यान्वित; समुद्राची धूप रोखण्यात होणार मदत

खासगी आस्थापनांवरही कारवाई करा!

या खाडीत जरी जीटीडीसीच्या बालोद्यानातील शौचालयाचे सांडपाणी मिसळल्याने संबंधितांना नोटीस बजावली असली तरी परिसरातील काही खासगी आस्थापनांचे सांडपाणीही खाडीतील पाण्यात मिसळत आहे. त्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न आल्मेदा यांनी केला आहे.

Colva Creek Pollution
Colva: कोलवा किनाऱ्यावरील बालोद्यानाची दुरवस्था! धोकादायक विद्युत बोर्ड, मोडलेली खेळणी; स्थानिकांनी फिरवली पाठ

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नादुरुस्त

या शौचालयाची पाहणी करण्यात आली असता, ४० केएलडी क्षमतेचा शौचालयाचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालत नसल्याचे तसेच त्याला देखभाल व दुरुस्तीची गरज असल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com