पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

World Tourism Day 2025: पाएस याने त्यावेळेची विजयनगरची संपत्ती, रायचूरची लढाई, कृष्णदेवरायचे एक लाख सैन्य आणि विजापूरची अदिलशहा सल्तनत याबद्दल उल्लेख केले आहेत.
Tale Of a Portuguese trader who visited vijaynagar in 16th century
Domingo Paes IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

या लेखात तुम्ही खालील गोष्टींची माहिती घ्याल.

१. डोमिंगो पाएसने भारतात केलेला प्रवास.

२. डोमिंगो पाएसने विजयनगरचे लिहिलेले वर्णन.

३. डोमिंगो पाएसची मंदिराबाबतची वर्णने.

डोमिंगो पाएस हा पोर्तुगीज व्यापारी होता ज्याला प्रवासाची आवड होती. त्याने अनेक देशांना भेटी दिल्या. १५२० दरम्यान जेंव्हा पोर्तुगीज सत्ता गोव्यात मुळे घट्ट करत होती त्यादरम्यान तो भारतात आला. इतिहासकार बॅरोज याला लिहिलेल्या पत्राच्या नोंदीनुसार तो गोवा आणि आसपास फिरला असल्याचेही ध्यानात येते.

भारतात त्याने १६व्या शतकात विजयनगर साम्राज्याची भेट घेतली होती. याबाबतच्या त्याच्या काही नोंदी उपलब्ध आहेत. त्याने राजा कृष्णदेवराय यांच्या राजवटीत साम्राज्याला भेट दिली आणि "क्रोनिका डॉस रेईस डी बिसनागा" या स्वतःच्या पुस्तकात विजयनगरचे प्रशासन, लष्कर, अर्थव्यवस्था आणि त्यावेळेची हंपी (राजधानी) यांचे सविस्तर वर्णन केले आहे.

जे विजयनगर साम्राज्याच्या इतिहासासाठी एक महत्त्वाचा संदर्भ मानला जातो. कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली राजा मानला जातो. पाएस याने त्यावेळेची विजयनगरची संपत्ती, रायचूरची लढाई, कृष्णदेवरायचे एक लाख सैन्य आणि विजापूरची अदिलशहा सल्तनत याबद्दल उल्लेख केले आहेत.

विजयनगर

विजयनगरबाबत लिहिताना तो म्हणतो की हे साम्राज्य समुद्रकिनाऱ्यापर्यंत पसरलेले आहे. या परिसरात पोचण्यासाठी त्याले अनेक डोंगररांगा पार कराव्या लागल्या आणि घनदाट जंगलांमधून प्रवास करावा लागला. इथे सुसज्ज बंदरे आणि पोर्तुगीजांच्या वखारी असल्याच्याही नोंदी त्याच्या लिखाणात आढळतात. तो मडगाव, भटकळ, मेंगलोर, कन्नूर या शहरांचाही उल्लेख करतो.

इथल्या शहरांच्या भोवती आंबा, फणस, चिंचेची झाडे आहेत याबाबतही तो आवर्जून लिहितो. त्याने लिहिलेले मोठ्या वडाच्या झाडाचे वर्णन फार मजेशीर आहे.

तो म्हणतो या झाडाचा पसारा इतका मोठा आहे या खाली आम्ही ३२० घोडे बांधू शकलो. हा सगळा प्रदेश सधन समृद्ध असल्याचेही त्याने लिहिले आहे. इथे गाईबैल, शेळ्यामेंढ्या दिसतात तसेच कडधान्ये, भात, मका अशी पिके आढळतात असे लिहून तो म्हणतो की आमच्या देशातसुद्धा इतकी पिके घेतली जात नाहीत.

पश्चिमेस गोव्याचा प्रदेश असल्याचे लिहून तो भाग आदिलशहाकडून आमच्या लोकांनी अर्थात पोर्तुगीजांनी जिंकून घेतल्याचाही तो उल्लेख करतो. विजयनगर साम्राज्याच्या परिसरातील लोक सुदृढ, धिप्पाड आणि गहूवर्णीय असल्याची तो माहिती देतो. शहराबद्दल तो लिहितो की हा भाग अनेक टेकड्यांमध्ये पसरलेला आहे. मोठ्या टेकडीवरून हे शहर रोमइतके मोठे आणि सुंदर दिसते.

Tale Of a Portuguese trader who visited vijaynagar in 16th century
Goa History: 'राजगो'ला देहांताची शिक्षा फर्मावली, त्याने म्हादईच्या डोहात आंघोळ केली, शिक्षेसाठी तयार झाला; वंदनीय महापुरुष

मंदिरे

डोमिंगोने अनेक मंदिरांना भेटी दिल्या. त्याने धारवाड परिसरातील मंदिराबाबत लिहून ठेवले आहे. इथल्या मंदिरांवर वेगवेगळ्या प्रतिमा कोरलेल्या आहेत असे तो लिहीतो. गणपती या देवतेच्या मंदिरबद्दल लिहताना तो उल्लेख करतो की या देवतेला मानवी शरीर आणि हत्तीचे तोंड असते आणि सहा हातात शस्त्रे असतात . त्याने धारवाडमधल्या एकाष्म मंदिराची माहितीही लिहिली आहे.

Tale Of a Portuguese trader who visited vijaynagar in 16th century
Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

FAQS

प्रश्न १: डोमिंगो पाएस कोण होता?

उत्तर: डोमिंगो पाएस हा एक पोर्तुगीज व्यापारी आणि प्रवासी होता.

प्रश्न २: डोमिंगो पाएस भारतात कुठे फिरला?

उत्तर: डोमिंगो पाएस भारतात विजयनगर साम्राज्याच्या गोवा हद्दीपर्यंत फिरला.

प्रश्न ३: विजयनगर आणि गोव्याचा काय संबंध आहे.

उत्तर: विजयनगर साम्राज्याची हद्द गोव्यापर्यंत होती.

प्रश्न ४: डोमिंगो पाएसने मंदिरांबाबत काय वर्णन केले?

उत्तर: त्याने धारवाड परिसरातील अनेक मंदिरांना भेट दिली आणि त्यावर कोरलेल्या वेगवेगळ्या प्रतिमा, गणपती मंदिरातील मानवी शरीर व हत्तीचे तोंड, सहा हातातील शस्त्रे यांचा उल्लेख केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com