Colva Police Arrest Two for Assault at Benaulim Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बाणावलीत भरदिवसा राडा! किरकोळ वादातून तुफान हाणामारी, काचेच्या बाटल्यांनी हल्ला; कर्नाटक, सिक्कीममधील दोघे अटकेत

Colva Police Arrest Two for Assault at Benaulim Beach: गोव्यातील दक्षिण भागात असलेल्या प्रसिद्ध बाणावली बीच रोडवर किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

Sameer Amunekar

कोलवा: गोव्यातील दक्षिण भागात असलेल्या प्रसिद्ध बाणावली बीच रोडवर किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत कर्नाटक आणि सिक्कीममधील दोन तरुणांना अटक केली आहे. संशयितांनी फिर्यादीवर काचेच्या बाटल्यांनी हल्ला केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, बाणावली बीचकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला. कर्नाटकचा रहिवासी शिवा कामदळी आणि सिक्कीमचा रहिवासी दिज्जन कुमार सिंग या दोघांचा फिर्यादीसोबत कोणत्यातरी कारणावरून वाद झाला.

हा वाद इतका विकोपाला गेला की, संशयितांनी रागाच्या भरात रस्त्या कडेला पडलेल्या काचेच्या बाटल्या उचलल्या आणि फिर्यादीवर हल्ला चढवला. या जीवघेण्या हल्ल्यात फिर्यादीच्या छातीवर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

कोलवा पोलिसांकडून कारवाई

घटनेची माहिती मिळताच कोलवा पोलीस ठाण्यातील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी जबाब नोंदवून घेत शिवा कामदळी आणि दिज्जन कुमार सिंग या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी वर्दळ असते, मात्र अशा प्रकारच्या हिंसक घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेषतः मद्यधुंद अवस्थेत होणारे वाद आणि त्यातून होणारे हल्ले रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage: व्यावसायिक सिलिंडरचा अजूनही तुटवडा, पणजीतील हॉटेलचालकांची अजूनही पळापळ सुरू

Goa Cancer Statistics: 5 वर्षांत गोव्‍यात 4,762 जणांचा कॅन्‍सरमुळे मृत्‍यू, प्रत्‍येक दिवशी सापडतात सरासरी पाच रुग्‍ण

सावधान! लघवीतून रक्त येणे असू शकतो मृत्यूचा सांगावा, नव्या संशोधनातून धक्कादायक खुलासा; जीवघेण्या आजारानं वाढवली चिंता

Iran US Israel War: इराणवर आतापर्यंतचा सर्वात भीषण प्रहार! 'युद्ध आमच्याच अटींवर संपणार', अमेरिकन संरक्षण सचिवांची गर्जना

'इथे भारतीय येत नाहीत म्हणून स्वच्छता आहे'! गोव्यातील बीचेसबाबतीत सोशल मीडियावर रंगली चर्चा; नेटकऱ्यांच्या धमाल कमेंट्स वाचा..

SCROLL FOR NEXT