Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Housie Ban: बंदी असतानाही 13 लाखांची हाऊजी! म्युझिकल शोच्या नावाखाली वार्का येथील प्रकार; कोलवा पोलिसांकडून गुन्हा नोंद

Housie game at Verca: जिल्हा प्रशासनाने हाऊजीला बंदी घातली असताना प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सासष्ट्यीत या जुगाराचे सर्रास आयोजन केले जात आहे.

Sameer Panditrao

मडगाव: जिल्हा प्रशासनाने हाऊजीला बंदी घातली असताना प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सासष्ट्यीत या जुगाराचे सर्रास आयोजन केले जात आहे. कोलवा पोलिसांनी वार्का येथे आयोजित एका हाऊजीवर कारवाई केली. आयोजक तसेच इतरांवर जुगार प्रतिबंधात्मक कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. या हाऊजीवर तब्बल १३ लाखांचे इनाम ठेवले होते.

या हाऊजीचा आयोजक प्रोतोस फर्नांडिस व इतरांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रितेश तारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल खाजनेकर पुढील तपास करीत आहे.

वार्का स्पोर्ट्स क्लब मैदानावर म्युझिकल शोच्या नावाखाली या हाऊजीचे शुक्रवारी (ता. २५) रोजी सायंकाळी सात ते रात्री दहा दरम्यान आयोजन केले होते. कोलवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली, मात्र तोपर्यंत सर्व कार्यक्रम पार पडला होता.

जिल्हात मोठ्या प्रमाणात हाऊजीचे आयोजन केले जात असल्याने दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली होती. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी ऐग्ना क्लेटस यांनी एका आदेशाद्वारे या हाऊजीवर बंदी घालताना, कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले होते. आदेश जारी केला असला तरी अजूनही मोठ्या प्रमाणात हाऊजीचे आयोजन केले जात असून, लाखांची बक्षिसे ठेवली जात आहेत. त्यावर कारवाई करण्यास पोलिस यंत्रणाही कमी पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कारवाईकडे लक्ष

यापूर्वी नावेली, बाणावली तसेच केपे येथेही हाऊजीचे आयोजन करण्यात आले होते. इस्टर झाल्यानंतर आता अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाऊजीचे आयोजन करण्यात आल्याचे वृत्त आहे. याबाबत पोलिसांनाही माहिती मिळाली आहे. मात्र पोलिस काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT