Colva Drain Pollution Dainiak Gomantak
गोवा

Colva Drain Pollution: कोलवा येथील नाल्यात कुजलेल्या मासळीचा खच, परिसरात दुर्गंधीने नागरिक हैराण; चार वर्षांपासून नाल्याची साफसफाई रखडली

Rotten Fish Smell Colva: कोलवा येथील भरवस्तीतील एका नाल्यात कुजलेल्या मासळीमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: कोलवा येथील भरवस्तीतील एका नाल्यात कुजलेल्या मासळीमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्‍यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.या प्रकाराची दखल घेत समाजकार्यकर्ते वॉरेन आलेमाव यांनी स्थानिकांसह नाल्याची पाहणी केली. उद्यापासून नाल्याच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.

यावेळी बोलताना आलेमाव यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांत हा नाला एकदाही स्वच्छ करण्यात आलेला नाही. नाल्यातील पाणी प्रदूषित झाल्याने त्यामधील मासळी कुजली असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. हे काम जलस्रोत खात्याच्या अखत्यारित येत असले, तरी संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

आजपासून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

याबाबत संबंधित विभागाला माहिती देण्यात आली होती; मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पंचायत सचिवांनी आरोग्य खात्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. अखेर वॉरेन आलेमाव यांनी उद्यापासून स्वच्छता मोहीम हाती घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे स्थानिक रहिवासी माडोना फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT