Colva Dainik Gomantak
गोवा

Colva: कोलवा येथील खाडीची संयुक्त तपासणी; पाण्याचे नमुने गोळा, सांडपाण्याचे स्रोत शोधण्याचे आव्हान

Colva creek joint inspection: आयकॉनिक बीच म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या कोलवा समुद्रकिनाऱ्यालगत असलेली खाडी सध्या प्रदूषित झाली असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलसंपदा विभाग व सांडपाणी विभागाकडून संयुक्त तपासणी करण्यात आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: आयकॉनिक बीच म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या कोलवा समुद्रकिनाऱ्यालगत असलेली खाडी सध्या प्रदूषित झाली असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलसंपदा विभाग व सांडपाणी विभागाकडून संयुक्त तपासणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान चाचणीसाठी खाडीच्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले असून, या पाण्याची तपासणी करून खाडीतील प्रदूषणाचे प्रमाण निश्चित करण्यात येणार आहे.

या पाहणीवेळी स्थानिक सरपंच तेरेझा सिल्वा तसेच कोलवातील काही नागरिक उपस्थित होते. या खाडीतील प्रदूषणाबाबत स्थानिक रहिवाशांनी तक्रार दाखल केली होती. या खाडीत सांडपाणी सोडले जात असल्यामुळे प्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे.

मात्र, हे सांडपाणी नेमके कोठून येते, हे शोधणे गरजेचे असल्याचे मत सिल्वा यांनी मांडले. काही आस्थापनांकडून खाडीत सांडपाणी सोडले जात असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cutbona Jetty: कुटबण जेटीवर अस्वच्छतेचे साम्राज्य! आरोग्य खात्याच्या पाहणीत अनेक त्रुटी उघड; पाणीपुरवठ्या अभावी कामगारांचे हाल

म्हापसा नालेसफाईचा केवळ फार्स? पावसाळ्यापूर्वी प्रशासनाचा चालढकलपणा; नाल्यातील गाळ काठावरच ठेवल्यानं 'टुगेदर फॉर म्हापसा' संघटनेचा संताप

Goa Assembly Elections 2027: सासष्टीचा 'तो' बालेकिल्ला काँग्रेस पुन्हा जिंकणार? 2027 कडे सर्वांचे लक्ष; नुवे, बाणावली, कुडतरी आणि वेळ्ळी मतदारसंघांत पुन्हा एकदा चुरशीची लढत

Shocking News: रागाचा झटका बेतला जिवावर! स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून देवाला केला अर्पण; बायकोसोबतच्या वादातून 25 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Goa Human Trafficking: हरमल वेश्याव्यवसाय प्रकरणात दोन संशयितांना जामीन, ठोस पुराव्यांचा अभाव; पीडित महिलांनी साक्ष देण्यास दिला नकार

SCROLL FOR NEXT