Women World Cup Football Tournament Dainik Gomantak
गोवा

Women World Cup Football Tournament: महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत कोलंबियाची ऐतिहासिक आगेकूच

17 वर्षांखालील विश्वकरंडक पेनल्टींवर नायजेरियास नमवून अंतिम फेरीत, गोलरक्षक विजयाची शिल्पकार

दैनिक गोमन्तक

पणजी: कोलंबियाने फिफा 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ऐतिहासिक आगेकूच राखताना प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली. पेनल्टी शूटआऊटमध्ये निर्णायक फटका अडविणारी गोलरक्षक लुईसा आगुदेलो त्यांच्या विजयाची शिल्पकार ठरली. निर्धारित वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर दक्षिण अमेरिकन संघाने उपांत्य लढतीत नायजेरियास पेनल्टींवर 6-5 फरकाने हरविले.

(Women World Cup Football Tournament)

स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना बुधवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. पेनल्टी शूटआऊटमध्ये नायजेरियाच्या दोघींना अपयश आले. अगोदर एदाफे ओमामुझे हिचा फटका गोलपोस्टला आपटला, तर कम्फर्ट फोलोरुन्शो हिची पेनल्टी किक गोलरक्षक लुईसा हिने अचूक अंदाज बांधत अडविला. त्यापूर्वी कोलंबियाच्या येसिका मुनोझ हिचा पेनल्टी फटका नायजेरियाची बदली गोलरक्षक चिकाम्सो जिवॉकू हिने अडविला होता. कोलंबियाची गोलरक्षक सामन्याची मानकरी ठरली.

डावपेच फसले

नायजेरियाने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत पेनल्टी शूटआऊटवर अमेरिकेस हरवून प्रथमच उपांत्य फेरी गाठली होती. तेव्हा प्रशिक्षक बंकोले ओलोवूकेरे यांनी पेनल्टींसाठी गोलरक्षकास बदलले होते. बुधवारच्या लढतीतही त्यांनी तेच डावपेच वापरले, पण अपयशी ठरले.

प्रशिक्षकाने सामना गोलशून्य बरोबरीकडे झुकत असताना इंज्युरी टाईममध्ये नियमित गोलरक्षक फेथ ओमिलाना हिच्या जागी चिकाम्सो हिला संधी दिली, मात्र पेनल्टींवर ती एकच फटका अडवू शकली.

पाचव्या प्रयत्नांत यशस्वी

फिफा 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत कोलंबियाचे यापूर्वी चार वेळा साखळी फेरीतच आव्हान संपले होते. यावेळेस कार्लोस पेनियागा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने थेट अंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धेत तीन वेळा उपांत्यपूर्व फेरीत गारद झालेल्या नायजेरियाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी नायजेरियाने कोलंबियावर साखळी फेरीत दोन वेळा मात केली होती. आफ्रिकन संघाने २०१२ मध्ये 3-0 असा, तर 2014 मध्ये 2-2 असा विजय मिळविला होता, मात्र बुधवारी कोलंबियाचा संघ वरचढ ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT