Illegal land encroachment goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: सरकारी, सार्वजनिक भूखंडांवर राहणार आता कडक नजर! तालुकानिहाय पथके स्थापन; सुट्ट्यांच्या दिवशीही कडक देखरेख

Illegal land encroachment goa: ही पथके आठवड्याचे सातही दिवस, दिवस-रात्र कार्यरत असतील. शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही ही व्यवस्था सुरू राहणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी तसेच कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण रोखण्यासाठी व हटवण्यासाठी तालुकानिहाय पथके स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही पथके उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार असून, सरकारी व सार्वजनिक जमिनीवर कडक देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने ही कारवाई राबवली जाणार आहे.

ही पथके आठवड्याचे सातही दिवस, दिवस-रात्र कार्यरत असतील. शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही ही व्यवस्था सुरू राहणार आहे. या पथकांमध्ये पोलिस विभाग, नगररचना खाते तसेच स्थानिक पंचायत किंवा नगरपालिका यांचे प्रतिनिधी सहभागी असतील.

बेकायदेशीर अतिक्रमणांबाबत नागरिकांनी थेट माहिती देता यावी, यासाठी लवकरच एक स्वतंत्र व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर केला जाणार आहे. या क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाईल. कोणतेही नवीन अनधिकृत बांधकाम आढळल्यास ते त्वरित थांबवण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

‘माझे घर’ योजनेच्या कक्षेबाबतही स्पष्टता

याच आदेशात सरकारने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या ‘माझे घर’ योजनेच्या कक्षेबाबतही स्पष्टता देण्यात आली आहे. ही योजना केवळ ठरावीक अटी पूर्ण करणाऱ्या भूमिहीन व्यक्तींनाच लागू आहे.

२८ फेब्रुवारी २०१४ पूर्वी ज्यांनी सरकारी किंवा कोमुनिदाद जमिनीवर राहण्यासाठी घर बांधले आहे आणि त्या तारखेपूर्वी सलग किमान १५ वर्षे गोव्यात वास्तव्यास होते, अशाच व्यक्तींना या योजनेअंतर्गत संरक्षण मिळेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT