Amarnath Panajikar
Amarnath Panajikar Dainik Gomantak
गोवा

संसद भवनासाठी माती गोळा करण्यावरुन अमरनाथ पणजीकरांची भाजपवर टीका

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार ‘संसद भवनासाठी माती संकलन’ या देशव्यापी कार्यक्रमाद्वारे भोळ्याभाबड्या जनतेच्या भावनांशी खेळत आहे. गोळा केलेली माती शेवटी कुठेतरी फेकली जाईल किंवा भाजपसाठी निधी तयार करण्यासाठी विकली जाईल असा आरोप काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. ( Collected soil from Goa for Parliament; Congress leader Amarnath Panajikar criticizes BJP )

अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम मंदिरासाठी भाजप तसेच त्या पक्षाशी सलग्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांनी गोळा केलेल्या विटांची मला गोव्यातील लोकांना आठवण करून द्यायची आहे. त्या विटा आता कुठे आहेत ? असा प्रश्न उपस्थित करुन, अमरनाथ पणजीकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ‘रामशीला’ म्हणून जमा केलेल्या विटांचे काय झाले हे स्पष्ट करण्याची मागणी केली.

या विटा तथा रामशीला भाजप कार्यकर्ते व स्वयंसेवकांकडे देण्यापूर्वी राज्यभरातील लोकांनी आपल्या देवघरांत "राम शीलांची" पूजा केली होती. आज, अयोध्येतील श्री राम मंदिराचे बांधकाम मार्बल आणि ग्रॅनाइट्सने केले जाते. त्या विटांच्या विक्रीतून भाजपच्या संघटनांनी पैसा कमावल्याचा आरोप झाला होता आणि त्यावर आजपर्यंत भाजपतर्फे कोणीही स्पष्टीकरण दिलेले नाही, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

आमच्या खाणपट्ट्यातील माती मोदी-शहांच्या क्रोनी क्लबला देण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रथम या सुंदर राज्याच्या मातीचा आणि पाण्याचा आदर करायला शिकले पाहिजे. आमच्या खाणपट्ट्यातील मौल्यवान माती मोदी-शहांच्या क्रोनी क्लबला देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमची जीवनदायिनी म्हादई नदी या आधीच राजकीय फायद्यासाठी भाजपने कर्नाटकला विकली आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

संवेदनाशून्य भाजप सरकारकडून या राज्याच्या सुपीक मातीचे कोळसा धुळीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रस्तावित नवीन संसद भवनासाठी माती गोळा करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही. करोडो रुपये खर्चाचे नवीन संसद भवन मातीने बांधले जाणार की सिमेंट आणि काँक्रीटने ? असा खोचक प्रश्न अमरनाथ पणजीकर यांनी विचारला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT