वास्को: परंपरागत रितीरिवाजांना फाटा देऊन गणेश चतुर्थीनिमित्त वाहिलेले निर्माल्य गणेश भक्तांनी वैज्ञानिक पद्धतीने संकलित करण्यासाठी स्वतःहून सहभाग घेतला. दहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या निर्माल्य संकलन मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून, सात दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर 2.8 मेट्रिक टन संकलित झाले.
निर्माल्यमध्ये फुले, धान्य, पाने, हार आणि गणेश मूर्तींवर सुशोभित केलेल्या इतर वस्तूंचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे या वस्तू गणेश मूर्तीसह विसर्जन केल्या जात होत्या. गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण जलाशय व्यापून टाकत होत्या.
वास्को, बायणा आणि न्यू वाड्डे येथील सर्व विसर्जन स्थळांवर मोठ्या संख्येने किशोरवयीन स्वयंसेवक निर्माल्य गोळा करताना दिसले तर काही लोकांनी स्वेच्छेने त्यांचे निर्माल्य संकलन केंद्रांना अर्पण केले.
निर्माल्य मोहिमेचे संस्थापक सदस्य असलेले एमपीडीएचे माजी अध्यक्ष कृष्णा दाजी साळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या वर्षी मोठ्या संख्येने स्वयंसेवक या मोहिमेत सामील झाले होते. बायणा, खारीवाडा आणि वाड्डे तलावाच्या तिन्ही विसर्जन स्थळांवरून दोन दिवस आणि पाच दिवसांच्या विसर्जनानंतर आमच्या निर्माल्य संकलनाची ही तिसरी फेरी आहे. प्रत्येक वेळी आम्ही सुमारे 900 किलो निर्माल्य गोळा केले आणि आतापर्यंत आम्ही निर्माल्य संकलनाचे 2800 किलोचा टप्पा पार केला.मोहिमेच्या सर्व यशाचे श्रेय मरगाव तालुकावासियांना आहे, ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. हरित पर्यावरण आणि स्वच्छ पाणवठ्यांसाठी योगदान दिले आहे. मी पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांचेही आभार मानतो, ज्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. आम्हाला संकलन केंद्रे उभारण्यासाठी मजूर आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करू दिल्या, त्यांनी नमूद केले.
गोळा केलेले हे निर्माल्य सांकवाळ येथील वर्मी कंपोस्ट प्लांटमध्ये पाठवले जाईल आणि १४ दिवसांच्या आत खतामध्ये रूपांतरित केले जाईल. शेतकऱ्यांना परत मोफत दिले जाईल. खत शेतीसाठी वापरले जाईल. हा एक यशस्वी पर्यावरणपूरक उपक्रम होता जिथे प्रत्येकाने निसर्गासाठी योगदान दिले आहे, असे साळकर यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.