Codar IIT Project Dainik Gomantak
गोवा

Codar IIT Project: 'आयआयटी'ला तीव्र विरोध! कोडारवासीयांची सह्यांची मोहीम; मंत्री सुभाष शिरोडकर यांना निवेदन

Goa IIT Project: कोडार-बेतोडा येथील आयआयटी विरोधासाठी स्थानिकांकडून सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली असून यासंबंधीची निवेदने लोकप्रतिनिधी तसेच सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.

Sameer Panditrao

फोंडा: आयआयटी प्रकल्पाला सध्या लोकांचा विरोध वाढत असून लोक एकवटले असल्याने सत्तरी, सांगे आणि केपेप्रमाणेच येथेही आयआयटीचा ‘फियास्को’ होण्याची शक्यता आहे. सरकारने आयआयटी रद्द करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे. दरम्यान, कोडार येथे आयआयटी आणण्यास कोडारवासीयांचा तीव्र विरोध असल्याचे ग्रामस्थांतर्फे एक निवेदन विश्राम गावकर व इतरांनी स्थानिक आमदार तथा सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांना दिले.

कोडार येथील १४ लाख ६३ हजार चौरस मीटर जमीन आयआयटीसाठी देण्याचे कोमुनिदादने ठरवल्यानंतर यासंबंधीच्या हरकती ३० दिवसांच्या आत देण्याची सूचना सरकारने केली आहे. या सूचनेमुळे आता ग्रामस्थांत चलबिचल निर्माण झाली असून प्रस्तावित आयआयटी प्रकल्पामुळे कोडार व नजीकच्या भागातील जैवसंपदा धोक्यात येण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे कोडार आणि इतर भागातील लोक शेतीबागायतीवर निर्भर आहेत. या भागात नोकऱ्यांचे प्रमाण दुय्यम असून सरकारी नोकर तर नगण्य आहेत. त्यामुळे सर्वस्वी शेती बागायतीवर निर्भर असलेल्या शेतकऱ्यांनी आयआयटीला तीव्र विरोध दर्शवला आहे.

प्रस्ताविक जागा ही खडकाळ असल्याचे सांगितले जात असले तरी खुद्द कोमुनिदादच्या पदाधिकाऱ्यांनी या भागातच मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याची मागणी यावेळी लोकांनी केली. या भागातील रोजीरोटीचे साधन नष्ट होऊ देणार नाही, आम्हाला आमची शेती-बागायती वाचवायची आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

कोडार तसेच बेतोडा व इतर भागात वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. येथील ८० टक्के जमीन ही लागवडीसाठी सुयोग्य असून त्यात लोक भाजीपाला तसेच इतर पिके घेतात. मुळात ज्या ठिकाणी आयआटी प्रकल्प प्रस्तावित आहे त्या भागाला ‘वाघोटी’ असे म्हणतात. या भागात वाघांचा संचार असल्याने वाघोटी हे नाव पडले असून इतर प्राण्यांत रानडुक्कर, गवे, मोर, हरण तसेच अन्य प्राण्यांचा समावेश आहे. आयआयटी प्रकल्प आल्यास या जनावरांनी जायचे कुठे, असा सवाल ग्रामस्थांनी केला.

रोजीरोटी धोक्यात

स्थानिकांची रोजीरोटी धोक्यात

कष्टकरी समाज पीक काढून पोट भरतो, त्यावर गदा येणार

आदिवासी समाजाचे कोडार - बेतोड्यात प्राबल्य

जैवसंपदेसह झाडांंची होणार मोठ्या प्रमाणात कत्तल

वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात

कूपनलिका खोदल्यास स्थानिकांना पाण्याची टंचाई

स्थानिकांना अंधारात ठेवून निर्णय घेतल्याचा दावा

बेतोडा पंचायतीने ग्रामसभा घेऊन आयआयटीविरोधात ठराव घेण्याची मागणी.

स्थानिक आमदारासह कोमुनिदाद प्रशासक आणि इतर संबंधितांना देणार निवेदने

येथे असलेली जैव आणि वनसंपदा नष्ट करून कोडार भागात आयआयटी उभारणे गैर असून येथील लोकांच्या रोजीरोटीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसे पाहायला गेल्यास आयआयटी प्रकल्प चांगला आहे; पण तो कोडार भागात असलेली वनसंपदा नष्ट करून उभारला जाऊ नये.
विश्राम गावकर, कोडार-बेतोडा
आयआयटी प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध आहे. या ठिकाणी प्रकल्प उभारल्यास आमची रोजीरोटी हिरावून घेतली जाईल. येथील वनराई नष्ट होऊन वन्य प्राण्यांचा अधिवास संपुष्टात येईल, म्हणून सरकारने आयआयटी प्रकल्प रद्द करावा, अशी आमची विनंती आहे.
सत्यवती गावडे, बेतोडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानविरूध्दच्या सामन्याआधीच टीम इंडियाला तगडा झटका, 'या' स्टार खेळाडूनं सोडली साथ, कारण काय?

नेपाळी नागरिकाचा गोव्यात संतापजनक प्रकार; दोन पाळीव कुत्र्यांना विष देऊन केले ठार

Delhi High Court Bomb Threat: तीन बॉम्ब ठेवलेत, थोड्याच वेळात फुटतील... दिल्ली उच्च न्यायालयाला धमकीचा मेल, पोलिस अलर्ट मोडवर

Rangoli: एक लाख रुपयांची 'रांगोळी', गोव्यात उंबरठ्यापलीकडे गेलेली कला

Rohit Sharma: वनडे रिटायरमेंटच्या चर्चेला पूर्णविराम! रोहित शर्मानं VIDEO शेअर करत दिलं मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT