Goa IIT Dainik Gomantak
गोवा

Codar IIT Project: आयआयटीविरोधात विशेष ग्रामसभेची मागणी! कोडारमध्ये विरोध; सरपंचांना ग्रामस्थांचे निवेदन

Goa IIT Project: कोडार येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात बेतोडा, कोनशे, कोडार, निरंकाल पंचायतीने विशेष ग्रामसभा घेण्याची जोरदार मागणी करीत शुक्रवारी पंचायतीला एक निवेदन दिले.

Sameer Panditrao

फोंडा: कोडार येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात बेतोडा, कोनशे, कोडार, निरंकाल पंचायतीने विशेष ग्रामसभा घेण्याची जोरदार मागणी करीत शुक्रवारी पंचायतीला एक निवेदन दिले.

सध्या आयआयटी विरोध वाढत चालला असून विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा स्थानिकांना मिळत असल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे. आता ग्रामस्तरावरील विरोध प्रखरपणे समोर येण्यासाठी बेतोडा, कोनशे, कोडार, निरंकाल पंचायतीने विशेष ग्रामसभा बोलवावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे.

या विशेष ग्रामसभेसाठी एक निवेदन विश्राम गावकर व इतर ग्रामस्थांनी सरपंच मधू खांडेपारकर यांना सुपूर्द केले असून पंचायतीकडून पूर्ण पाठिंबा अपेक्षित केला आहे. विश्राम गावकर यांनी लोकांचा वाढता विरोध असल्यामुळे सरकारला कोडार येथील आयआयटी धोरण मागे घ्यावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. कोडार गावातील नैसर्गिक समृद्धी कदापि नष्ट होऊ देणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले.

तवडकरांचा पाठिंबा हवा!

कोडारवासीयांनी कला संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांना एक निवेदन सादर केले असून त्यांच्या पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली. ज्ञानेश्वर खांडेपारकर यांनी सर्व संबंधितांना निवेदने सादर केली जाणार असून कोडार गावात आयआयटी नकोच असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

कोडारवासीयांच्या एकजुटीमुळे सरकारी यंत्रणा अस्वस्थ झाली असून वाढता विरोध पाहून नियोजित आयआयटीला गाशा गुंडाळावा लागणार असल्याचा रंग दिसत असल्याचे फोंडावासीयांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सात दिवसांत मास्टरमाईंडचे नाव समोर न आल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार; मंत्री तवडकरांच्या नावाने व्हायरल होतोय फेक मेसेज

Vagator: 'सगळे पाणी हॉटेल्सना जातेय, आम्हाला काय'? वागातोर ग्रामस्थांची ‘पेयजल’च्या कार्यालयावर धडक; गैरव्यवस्थापन थांबवण्याची मागणी

Goa Live Updates: दवर्लीत 117 ग्रॅम गांजा जप्त, 33 वर्षीय व्यक्तीला अटक

Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला करा राशीनुसार 'या' गोष्टींचे दान, पितर होतील प्रसन्न; व्हाल धन-समृद्धीने संपूर्ण

Hamlet: इटलीत पोचला गोमंतकीय अभिनेता, शेक्सपियरचे 'हॅम्लेट' साकारतोय केतन; थिएटर हाऊसतर्फे प्रयोग केला सादर

SCROLL FOR NEXT