Goa Coconut Price Hike Dainik Gomantak
गोवा

Goa Coconut Market: नारळ स्वस्त होईना! दर गगनाला भिडले; वाढत्या महागाईने गोमंतकीय हैराण

Goa Coconut Price Hike: गेल्या दीड-दोन महिन्यांपासून नारळ भाव खात आहेत. चतुर्थीवेळी काहीसे स्वस्त झालेल्या नारळांच्या दरात चतुर्थीनंतर हळूहळू वाढ होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: दैनंदिन आहारातील मुख्य घटक असलेला नारळ काही केल्या स्वस्त होईना. उलट दर वाढतच आहेत. नारळ आता आणखी महाग झाल्याने सामान्य ग्राहकांच्या कपाळाला आठ्या पडू लागल्या आहेत.

गेल्या दीड-दोन महिन्यांपासून नारळ भाव खात आहेत. चतुर्थीवेळी काहीसे स्वस्त झालेल्या नारळांच्या दरात चतुर्थीनंतर हळूहळू वाढ होत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत नारळांच्या दरात आकारानुसार प्रती नगामागे आणखी किमान ५ ते १० रुपयांनी वाढ झाली आहे. डिचोलीच्या बाजारात नारळांचे दर सध्या प्रती नग ५० रुपयांपर्यंत पोचले आहेत.

नारळांचे दर वाढल्याने आधीच महागाईमुळे त्रस्त झालेली सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. दैनंदिन आहाराबरोबरच धार्मिक कार्यासाठी नारळांना मागणी असते. उत्पादनातील घट यामुळे बाजारात नारळांची कमतरता दिसून येत आहे.

उत्पादनात घट

गेल्या काही वर्षांपासून रोग आदी पादुर्भावामुळे नारळ उत्पादनावर परिणाम जाणवत आहे. यावर्षी मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यंदा नारळ उत्पादनात जवळपास ४० टक्के घट झाली आहे. अशी माहिती बागायतदारांकडून मिळाली आहे. तापमानात झालेली वाढ, त्यातच असंतुलित पावसाच्या माऱ्यामुळे नारळांच्या पिकावर परिणाम झाला आहे, अशी माहिती बागायतदारांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: "सोसायटी शोधायची तर चिटणीस वा अध्यक्ष शोधावा लागतो", गोव्यात सहकार क्षेत्र बळकट करणं का गरजेच?

Panaji Air Quality: सिगारेट ओढण्याची गरज नाही, पणजीतील हवा तुमचे आरोग्य बिघडवू शकते; वाचा धक्कादायक रिपोर्ट

Saint Francis Xavier Exposition: कॅमेरा, धारदार वस्तू, तंबाखू घेऊन जाण्यास मनाई; तीन शिफ्टमध्ये पोलिस ठेवणार सोहळ्यावर वॉच

Goa Today's Live Update: मायकल लोबोंना आम्ही रोखू शकत नाही; मांद्रेतून लढण्याबाबत कळंगुट सरपंच सिक्वेरांचे वक्तव्य

Delhi Goa Flight: दिल्ली - गोवा विमानात महिलेचा लैंगिक छळ; हरियाणातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT