Goa Zendu Flower Market: फुले खाऊ लागली 'भाव', जाणून घ्या गोव्यातले दर

Marigold Flowers Price Goa: देवपूजा तसेच सुशोभीकरणासाठी लागणारी विविध प्रकारची फुले बाजारात दाखल झाली असून, त्‍यांना मोठी मागणी आहे. झेंडूची फुले १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात आहेत.
Diwali Celebrations Goa: फुले खाऊ लागली 'भाव', झेंडू 150 ते 200 रुपये किलो; दिवाळीनिमित्त मागणीत प्रचंड वाढ
Marigold Flowers Price GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: देशाच्‍या इतर भागांप्रमाणेच गोव्‍यातही दीपावली सणाचा उत्‍साह ओसंडून वाहत आहे. खरेदीलाही वेग आला आहे. देवपूजा तसेच सुशोभीकरणासाठी लागणारी विविध प्रकारची फुले बाजारात दाखल झाली असून, त्‍यांना मोठी मागणी आहे. झेंडूची फुले १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात आहेत.

झेंडूची केशरी आणि पिवळी अशा दोन्ही रंगांची फुले बाजारात विक्रीस दाखल झाली आहेत. ग्रामीण भागात १२० ते दीडशे तर शहरी भागात १५० ते २०० असा त्‍यांचा दर आहे. तसेच या फुलांची एक माळ ८० ते १०० रुपये दराने विकली जात आहे.

Diwali Celebrations Goa: फुले खाऊ लागली 'भाव', झेंडू 150 ते 200 रुपये किलो; दिवाळीनिमित्त मागणीत प्रचंड वाढ
Goa Diwali: पायाखाली कडू कारीट चिरडून होते गोव्यात दिवाळीची पहिली आंघोळ; नरकासूर दहन, त्रिपुरासूर-वध परंपरा आजही जिवंत

आवक कमी आणि मागणी वाढल्याने फुलांच्‍या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात. पणजी बसस्थानक तसेच महानगरपालिकेच्या मार्केटमध्ये फुलांच्‍या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. आता पुढे लक्ष्‍मीपूजन, भाऊबीज तसेच इतर सण असल्‍याने फुलांची मागणी आणखी वाढणार आहे.

Diwali Celebrations Goa: फुले खाऊ लागली 'भाव', झेंडू 150 ते 200 रुपये किलो; दिवाळीनिमित्त मागणीत प्रचंड वाढ
Goa Diwali Festival: गोवातील मडगावचे भवानी हौशी मंडळ पहिले!

सण, उत्‍सवांच्‍या वेळी राजधानी पणजीत सर्वसाधारणपणे दोन टन फुले खरेदी केली जातात. चतुर्थी, दसरा आणि दिवाळीच्‍या काळात मोठ्या प्रमाणात फुले खरेदी केली जातात. दिवाळीनिमित्त पणजीत सुमारे चार टन फुलांची विक्री होते. पणजी बसस्थानकाजवळील मार्केटमध्ये फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. - दुर्गेश अगडी, पणजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com