CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: किनाऱ्यांची सुरक्षा होणार सक्षम; 15 मीटर इंटरसेप्टर बोट गोवा पोलिसांच्या ताफ्यात दाखल

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वास्को येथे कार्यक्रम

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: गोव्याची किनारी सुरक्षा आता अधिक सक्षम होणार आहे कारण किनारी पोलिसांच्या ताफ्यात आता 15 मीटर इंटरसेप्टर बोट दाखल झाली आहे.

गुरूवारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत वास्को शिपयार्ड येथे ही बोट पोलिस दलाकडे सोपविण्यात आली. यावेळी 59 लाख 40 हजार रूपयांचे तीन ड्रोन कॅमेऱ्यांचेही अनावरण झाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, ही इंटरसेप्टर बोट आम्ही खरेदी केली आहे. त्यातून आम्ही किनारी सुरक्षिततेबाबत किती गंभीर आहोत, हे दिसते. निर्धारित वेळेत गोवा शिपयार्डने ही बोट पूर्ण करून दिली. मला खात्री आहे, किनारी सुरक्षितते ही बोट महत्वाची भूमिका बजावेल.

मुख्यमंत्री म्हणाले, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशी ही बोट असणे गरजेचे होते. केंद्रीय स्तरावर आपण या बोटीसाठी बऱ्याचदा पाठपुरावा केला होता. दुसरे म्हणजे सध्या ड्रोन कॅमेरे, ड्रोन उपकरणे विविध गोष्टींसाठी महत्वाची ठरत आहेत.

तीन ड्रोन आपण खरेदी केली आहेत. त्यात हाय स्पीड आणि उच्च तंत्रज्ञान आहे. त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. त्यासाठी मनुष्यबळालाही प्रशिक्षण देण्यात आले आहे.

ते म्हणाले, किनारी सुरक्षिततेबाबत आम्ही गंभीर आहोत. आम्ही दलालांवर कारवाई करत आहोत, भिकाऱ्यांवर कारवाई करत आहोत. गुन्हेगारी कृत्यांवर कारवाई केली जात आहे. किनारी राज्य म्हणून आपण जास्त काळजी घेत आहोत.

देशभरातून, जगातून गोव्यात लोक येतात. पोलिसांनी कडक निगराणी ठेवावी, असे निर्देश दिले आहेत. गुन्ह्यांची उकल करण्यात गोवा पोलिस देशात पहिल्या क्रमांकावर आहेत. जी-२० बैठकांच्या आयोजनाची संधी आपल्याला मिळाले आहे, त्या संधीचे सोने करू.

या बोटीची वैशिष्ट्ये

  • बोटीची गती 32 ते 35 नॉट्स प्रतीतास. 150 नॉटिकल मैलपर्यंत निगराणी करता येणार

  • चार क्रु मेंबरसह 10 आसन क्षमता

  • 1500 लीटर टाकी

  • बंदर आणि उथळ पाण्यात दिवसा व रात्रीही निगराणी शक्य

  • एक लाईट मशिन गन बसवण्याची सोय, शस्त्रे ठेवण्यासाठी लॉकर

  • रडार, इको साऊंडर कम्युनिकेशन अँड मॅग्नेटिक कंपास, जीपीएस, व्हीएचएफ, पोलिस रेडियो, वॉकी टॉकी, नाईट व्हिजन दुर्बिण, सर्च लाईट्स या सुविधा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Racing Festival: ‘गोवा स्ट्रीट रेस’ वरून नवा वाद! सरकारी कराराचे उल्लंघन होत असल्याचा दावा

Chimbel Survey: चिंबलमधील 'तोयार'चे सर्वेक्षण पूर्ण! सरकारकडे अहवाल होणार जमा; मुख्‍यमंत्र्यांच्‍या भूमिकेकडे लक्ष

Ind Vs NZ T20: चौथ्या T20 साठी 2 बदल? संजू सॅमसन, कुलदीपबाबत मोठा निर्णय; कोण असणार अंतिम संघात?

Goa Politics: खरी कुजबुज; गोवा दूध उत्पादक संघ जीवंत आहे का?

Goa News: 2050 पर्यंत गोव्‍यात 100% नवीकरणीय ऊर्जा! CM सावंतांचे प्रतिपादन; कॅनडा, जपान, दक्षिण कोरियाशीही सहकार्य करार

SCROLL FOR NEXT