Colvale Police Raids: कोलवाळ येथे सकाळी सकाळीच धडकले पोलिसांचे पथक; 'हे' आहे कारण...

उत्तर गोव्यातील अनेक भागात पोलिसांची गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू
Colvale Crime
Colvale CrimeDainik Gomantak

Colvale Police Raids: गोव्यातील ठिकठिकाणच्या गुन्ह्यामध्ये परप्रांतीय नागरिकांचा सहभाग दिसून आल्यावर गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी भाडेकरू तपासणीची मोहिम सुरू केली आहे.

उत्तर गोव्यातील अनेक भागात पोलिसांकडून धाडी टाकल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरूवारी सकाळीच कोलवाळ येथे पोलिसांनी तपासणी केली.

यावेळी शंभरहून अधिक भाडेकरूंना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना पडताळणीसाठी पोलिस स्थानकात नेले होते. तिथे या भाडेकरूंच्या कागदपत्रांची तपासणी केली गेली.

Colvale Crime
Goa RajBhavan Bonsai: देशातील सर्वात मोठे बॉन्साय उद्यान गोव्याच्या राजभवनात

अनेक भाडेकरू आणि त्यांच्या मालकांची पोलिसांनी चौकशी केली. कोलवाळ येथील गणेशनगर, लाला की बस्ती या भागात पोलिसांनी ही मोहिम राबवली.

गोव्यात होणाऱ्या जी-२० बैठकीच्या पार्श्वभुमीवर ही कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन आणि म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली.

पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर गोव्यातील अनेक भागात ही मोहिम राबवली आहे. यातून अवैध कारवायांमध्ये गुंतलेले दलाल, भिकाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे.

गोव्यात गेल्या काही दिवसांमध्ये परदेशी पर्यटकांवर हल्ला किंवा फसवणुकीत परप्रांतीय नागरिकांचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते.

नेदरलँडच्या महिला पर्यटकावर हल्ल्याची घटना घडल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सर्व कामगारांच्या नोंदणीसाठी लेबर कार्डची घोषणा केली होती. सर्व खासगी आस्थापनांनाही कामगारांची सर्व माहिती ठेवण्याबाबत सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com