ICGS Sangram 
गोवा

ICGS Sangram: तटरक्षक दलाचे ICGS संग्राम 26 वर्षानंतर सेवानिवृत्त, मुरगाव बंदरावर रंगला सोहळा

29 मार्च 1997 रोजी गोवा येथे तत्कालीन नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल विष्णू भागवत यांनी कार्यान्वित केले होते.

Pramod Yadav

ICGS Sangram Decommissioned: भारतीय तटरक्षक दलाचे ICGS संग्राम 26 वर्षांच्या सेवेनंतर बुधवारी सेवेतून निवृत्त करण्यात आले. ICGS संग्राम तटरक्षक दलाचे सर्वात जुन्या प्रगत ऑफशोर पेट्रोल व्हेसल्सपैकी एक आहे.

डीआयजी विजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील हे जहाज मोल बर्थ, मुरगाव बंदर प्राधिकरण, गोवा येथे हा कार्यक्रम पार पडला.

कमांडर कोस्ट गार्ड रिजन (NW) इन्स्पेक्टर जनरल ए के हरबोला यांनी 2013 ते 2014 या काळात जहाजाचे नेतृत्व केले होते. हरबोला या समारंभासाठी प्रमुख पाहुणे होते.

या समारंभात जहाजाची टाइमलाइन आणि गेल्या काही वर्षांतील विविध कामगिरीचे प्रदर्शन करणारी स्मृतीचित्रेही प्रदर्शित करण्यात आली.

ICGS संग्राम 29 मार्च 1997 रोजी गोवा येथे तत्कालीन नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल विष्णू भागवत यांनी कार्यान्वित केले होते. कमांडर कोस्ट गार्ड रीजन (पश्चिम) च्या ऑपरेशनल कमांड अंतर्गत ते मुंबई येथे होते. शिकार विरोधी, शोध आणि बचाव आणि वैद्यकीय स्थलांतर यासह असंख्य ऑपरेशन्समध्ये संग्रामचा सहभाग होता.

101 मीटर लांब, 1888-टन वजनाचे हे जहाज 3,000 दिवसांहून अधिक काळ भारताच्या सर्व सागरी क्षेत्रांना कव्हर करत होते, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या सोहळ्यादरम्यान, गार्ड ऑफ ऑनरची परेड करण्यात आली आणि कोस्ट गार्डचे चिन्ह जहाजातून खाली उतरवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT