Goa Shipyard Jobs Dainik Gomantak
गोवा

गोवा शिपयार्डमध्ये स्थानिकांना नोकरीसाठी मुख्यमंत्री प्राधान्य देणार; कृष्णा साळकर

Goa Shipyard Jobs : डाॅ. प्रमोद सावंत येत्या दि. 18 किंवा 19 तारखेला गोवा शिपयार्डच्या व्यवस्थापनाकडे चर्चा करून एकंदर नोकरी भरती संबंधी माहिती घेणार आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा शिपयार्डमध्ये गोवेकरांना नोकरीसाठी प्राधान्य मिळावे यासाठी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांचे प्रयत्न सुरू होते. यावर आता आपले मत व्यक्त करत ते म्हणाले की, मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत येत्या दि. 18 किंवा 19 तारखेला गोवा शिपयार्डच्या व्यवस्थापनाकडे चर्चा करून एकंदर नोकरी भरती संबंधी माहिती घेणार आहे.

त्यामुळे गोवा शिपयार्डमध्ये गोमंतकीयांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात येत नसल्यासंबंधी रस्त्यावर येण्याचा निर्णय आम्ही मागे घेतला आहे. आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की मुख्यमंत्री या संदर्भात योग्य तोडगा काढतील. (CM to give preference to locals for jobs in Goa Shipyard; Krishna Salkar)

ब्रह्मस्थळ- जुन्ता वसाहत लगतच्या नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक दीपक नाईक, माजी नगराध्यक्ष कुय्येलो व इतर मान्यवर उपस्थित होते.

आमदार साळकर यांनी सांगितले की, पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्यरित्या व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुरगाव पालिकेने यापूर्वीच मान्सूनपूर्व कामांना आरंभ केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची जी भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे त्यामध्ये काहीच तथ्य नाही.आम्ही विकासकामांनाही वेग दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये लोकांना कामे दिसतील.

गोवा शिपयार्डच्या नोकर भरतीसंबंधी ते म्हणाले की, गोवा शिपयार्डने स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची गरज आहे. परंतु तसे होत नसल्याचे दिसून येत आहे. येथे केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या गोवा शिपयार्ड, एमपीट अशा सात यंत्रणा आहेत.

परंतु तेथे स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाही त्यासाठी राज्य सरकारने योग्य धोरण तयार करण्याची गरज असल्याचे आम्ही निवडणुकीपूर्वी स्पष्ट केले होते. सरकारमध्ये असल्याने आम्ही यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासमोर प्रश्न नेला. त्यांनी आंदोलने करू नका, आपण गोवा शिपयार्ड व्यवस्थापनाकडे बोलतो असे सांगितले. त्यानुसार 18 किंव 19 तारखेला संबंधित चर्चा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT