Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: कंत्राटी 14 कर्मचारी कसे तोंड देणार? गोवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देवानेच सांभाळावे; आलेमाव

गोव्यातील आपत्ती हाताळण्यासाठी गोवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तयारीबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी.

Pramod Yadav

'विधानसभेत दिलेल्या उत्तरांनी गोवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कुचकामी असल्याचे उघड झाले आहे. कंत्राटी पद्धतीने भरती केलेले 14 कर्मचारी आणि काही संगणक आणि टेलिफोन यांच्या आधाराने गोव्यातील आपत्तींना गोवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कसे तोंड देवू शकेल हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्पष्ट करतील का?' असा सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी काल गोवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत मान्सूनपूर्व तयारीच्या घेतलेल्या आढावा बैठकीवर विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी प्रतिक्रिया दिली. 'गोवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देवानेच सांभाळावे' असे आलेमाव म्हणाले.

गोवा विधानसभेच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांवरून गोवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे स्पष्ट होते. असे आलेमाव म्हणाले. तसेच, राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्रात (SEOC) एक डेस्कटॉप, एक एलईडी स्क्रीन, एक लँडलाइन टेलिफोन हँडसेट तसेच इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम केंद्रात (ERSS) एक ड्युअल स्क्रीन पीसीसह आयपी फोन, एक फायरहॉल तसेच 8 एमबीपीएस इंटरनेट लीज लाइन एवढीच उपकरणे उपलब्ध आहेत याकडे आलेमाव यांनी लक्ष वेधले.

महसूल मंत्री आंतानासियो मोन्सेरात यांनी त्यांच्या उत्तरात स्पष्टपणे सांगितले आहे की, सरकार आपत्ती व्यवस्थापनास लागणाऱ्या जड उपकरणांसाठी गोवा शिपयार्ड, मुरगाव बंदर प्राधिकरण आणि इतर खाजगी उद्योगांवर अवलंबून आहे.

सदर उत्तरात पुढे नमूद केले आहे की विविध आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, अग्निशमन सेवा आणि पोलिस यासारख्या संबंधित विभागांकडे उपकरणे आहेत. परंतू, आमच्याकडे असलेल्या विश्वसनीय माहितीनुसार यापैकी कोणत्याही विभागाकडे योग्य उपकरणे आणि मनुष्यबळ नाही, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.

गोव्यातील आपत्ती हाताळण्यासाठी गोवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तयारीबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी. गोवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे तपशील आणि गोव्यातील आपत्तींना तोंड देण्यासाठी गेल्या तीन वर्षात झालेल्या बैठका, प्रशिक्षण सत्रांची संख्या यांचा तपशील सरकारने जाहीर करावा, अशी मागणी आहे. असे युरी आलेमाव म्हणाले.

अपघात व आपत्ती प्रवण क्षेत्रात असलेल्या गोवा शिपयार्ड आणि मुरगाव बंदर प्राधिकरणावर सरकार विसंबून कसे राहू शकते? असा प्रश्न विचारत सरकारने एखाद्या आपत्तीच्यावेळी जलद प्रतिसादासाठी राज्यातील मोक्याच्या ठिकाणी आवश्यक उपकरणे व मनुष्यबळ ठेवणे गरजेचे असल्याचे युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT