CM Sawant meets Bollywood Star Ajay Devgn
CM Sawant meets Bollywood Star Ajay Devgn Dainik Gomantak
गोवा

Ajay Devgan Meets CM Sawant: बॉलिवूडचा सिंघम मुख्यमंत्र्यांच्या भेटीस, राज्यातील उद्योग वाढीवर केली चर्चा

दैनिक गोमन्तक

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बॉलीवूड स्टार अजय देवगणची येथे भेट घेतली; पणजी येथील महालक्ष्मी- अल्तिनो येथे ही भेट पार पडली. या भेटी दरम्यान गोव्यात व्यवसाय आणि रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्यासाठी राज्यात उद्योग कसा वाढवता येईल यावर सविस्तर चर्चा झाली. गोवा हे चित्रपट शूटिंगसाठी लोकप्रिय ठिकाण असल्याचे यावेळी बोलताना अजय देवगण यांनी सांगीतले.

(CM Sawant meets Bollywood Star Ajay Devgn at Mahalaxmi- Altinho, Panaji)

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करत बॉलीवूड स्टार अजय देवगण यांच्या अल्तिनो याथील भेटीची माहिती दिली. ते पुढे म्हणाले गोवा हे चित्रपट शूटिंगसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. अधिकाधिक व्यवसाय व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात उद्योगाचा विस्तार कसा करता येईल यावर अजय देवगण यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 53 व्या आवृत्तीला 20 तारखेपासून गोव्यात सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर बॉलीवूड स्टार अजय देवगण यांची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लक्षणीय उपस्थिती होती

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चित्रपट सृष्टीतील कलाकारांना केले आमंत्रित

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आरंभी पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्व चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, सिनेकलाकार यांना नव्या चित्रपट निर्मीतीसाठी गोव्यात आमंत्रित केले आहे. गोवा सरकार आपल्याला संपुर्ण सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT