Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलिस अडकला कॅश फॉर जॉब प्रकरणात, बायकोच्या नोकरीसाठी दिले 5 लाख; पाटकरांचा गौप्यस्फोट

Amit Patkar Press Conference: सरकारी नोकरी विक्री घोटाळा प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिच्यावर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे याचे उत्तर राज्य सरकारने द्यावे.

Manish Jadhav

राज्यात मागील काही दिवसांपासून कॅश फॉर जॉब प्रकरण चांगलंच गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कार्लुस फेरेरा यांनी आज (9 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेवून भाजपवर हल्लाबोल केला. या प्रकरणात भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्ते देखील सामील असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला.

या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तर दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एका पोलिस कॉन्स्टेबलने आपल्या बायकोला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी जॉब फॉर स्कॅम प्रकरणात अटकेत असलेल्या दीपश्री सावंत गावंस हीला 5 लाख रुपये दिल्याचा गौपस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

राजकीय वरदहस्त!

सरकारी नोकरी विक्री घोटाळा प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिच्यावर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे याचे उत्तर राज्य सरकारने द्यावे. एकामागोमाग एक घोटाळा बाहेर येत आहे. त्यामुळे त्यात भाजप सरकार भागीदार असून सत्ताधारी सर्व मंत्री व आमदारांच्या 'कॉल रेकॉर्ड'ची तसेच या घोटाळ्याची उच्य न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीनेही करण्यात आली.

गोमंतकीयांनी जागृत रहावे

कर्मचारी भरती आयोगामार्फत नोकरभरती केली जाणार असल्याचे राज्य सरकार सांगत आहे, पण ती काही होत नाही आणि या सरकारची लक्षणे काही ठीक दिसत नाहीत. साध्या वेशातील पोलिस अधिकारी एका मतदारसंघात वावरतो.

तो कधीच पोलिस मुख्यालयात जात नाही असे आपणास वाटत नाही त्या पोलिसाचा मोबाईल नंबर तपासायला हवा, त्याच्या सीडीआर आणि मोबाईल रेकॉर्डची तपासणी करावी. गोमंतकीयांनी आता जागे व्हावी, आम्ही करीत असलेल्या मागणीसाठी राज्यातील जनतेने पाठिंबा द्यावा आणि आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पालेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT