International Literacy Day 2025: शिक्षण हवं सर्वांसाठी, पण... शहरात सुलभ, ग्रामीण भागात दुर्लभ! कारणं काय?

Education: दरवर्षी ८ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा केला जातो. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असला तरी ग्रामीण व शहरी भागातील साक्षरतेच्या प्रगतीत आजही मोठी तफावत दिसून येते.
International Literacy Day 2025
International Literacy Day 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Rural Education Problems India

दरवर्षी ८ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा केला जातो. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असला, तरी ग्रामीण व शहरी भागातील साक्षरतेच्या प्रगतीत आजही मोठी तफावत दिसून येते. शहरांमध्ये शिक्षणाची साधनं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, मात्र ग्रामीण भागात अजूनही अनेक अडथळे आणि संघर्ष कायम आहेत.

शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. दर्जेदार शाळा, खाजगी क्लासेस, आधुनिक सुविधा, तांत्रिक साधनं, तसेच चांगले प्रशिक्षित शिक्षक यामुळे मुलांना शिक्षणात प्रगती करण्यासाठी आवश्यक वातावरण मिळतं.

पालकही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देतात आणि त्यासाठी आवश्यक खर्च करतात. त्यामुळे शहरातील मुलं केवळ शालेय अभ्यासच नव्हे तर स्पर्धा परीक्षा, खेळ, कला यांसारख्या क्षेत्रातही पुढे जात आहेत.

ग्रामीण भारत आजही साक्षरतेच्या बाबतीत अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. जरी गेल्या काही दशकांत शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढला असला, तरी शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये अजूनही अनेक अडथळे आहेत. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणातील अडचणी केवळ पायाभूत सुविधांपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक स्वरूपाच्या देखील आहेत.

अनेक गावांत प्राथमिक शाळा असल्या तरी माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा दूरवर असतात. लहान मुलांना रोजच्या प्रवासाचा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात नदी-पूल वाहून जाणं, रस्ते बंद होणं किंवा बससेवा खंडित होणं ही सामान्य समस्या असते. त्यामुळे शिक्षण खंडित होतं आणि मुलांमध्ये शाळेकडे जाण्याची इच्छाही कमी होते.

International Literacy Day 2025
Goa Coconut Price: बाप्पांचे विसर्जन झाले, तरी नारळ अजून भडकलेलेच; चिबूड, तवशांचीही आवक वाढली

ग्रामीण शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात शिक्षक नसल्याचं चित्र दिसतं. एका शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी असते, ज्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो. विषयानुसार तज्ञ शिक्षकांची नेमणूक न झाल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य धोक्यात येतं.

शिक्षणासाठी आवश्यक असणारे साहित्य, गणवेश, वह्या, पुस्तके किंवा शाळेची फी गरीब कुटुंबांना परवडत नाही. त्यामुळे मुलांना लहान वयातच मजुरी, शेतमजुरी किंवा इतर कामाला पाठवलं जातं. काही वेळा मुलींना शिक्षणाऐवजी घरकामाकडे वळवलं जातं, ज्यामुळे लवकरच त्यांचं शिक्षण थांबतं.

अनेक ग्रामीण शाळांमध्ये वीज, पिण्याचे पाणी, शौचालय, वाचनालय, खेळाचे साहित्य यांचा अभाव असतो. मुलींना शाळेत शौचालयांची सोय नसल्यामुळे त्यांचं शिक्षण मधेच खंडित होतं. या मूलभूत सोयींच्या अभावामुळे विद्यार्थी शाळेकडे आकर्षित होत नाहीत.

आजच्या काळात संगणक, इंटरनेट, स्मार्ट क्लासेस हे शिक्षणासाठी अत्यावश्यक झाले आहेत. मात्र, ग्रामीण शाळांमध्ये डिजिटल साधनांचा गंभीर अभाव आहे. यामुळे विद्यार्थी आधुनिक शिक्षण पद्धतींपासून दूर राहतात आणि स्पर्धेत मागे पडतात.

ग्रामीण भागातील साक्षरता वाढवणे ही फक्त शिक्षणाचीच नव्हे तर समाजाची प्रगती साधण्यासाठीही अत्यावश्यक बाब आहे. शिक्षणाचा अभाव अनेकदा सामाजिक व आर्थिक विकासाला अडथळा आणतो. यामुळे ग्रामीण साक्षरतेसाठी योग्य उपाययोजना करणे आणि दीर्घकालीन धोरण आखणे खूप महत्त्वाचे आहे.

International Literacy Day 2025
Goa Politics: भाजपला सनातन धर्माची पर्वा व आदर नाही, प्रदेशाध्यक्ष दामूंच्या वाढदिवशी मंदिरात केक कापणे 'अधर्म', काँग्रेसचा हल्लाबोल

ग्रामीण साक्षरतेच्या सुधारासाठी शासनाकडून विविध योजना आखल्या जातात, पण त्या यशस्वी होण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आवश्यक आहे. गावोगावी जाऊन शिक्षणाचे महत्त्व समजावणे, विद्यार्थ्यांना शाळांशी जोडून ठेवणे, तसेच पालकांना शिक्षणाबाबत जागरूक करणे ह्या कामात स्वयंसेवी संस्थांचा मोठा वाटा असू शकतो.

प्रत्येक गावात प्राथमिक शाळा असणे अत्यावश्यक आहे. तसेच जवळपास माध्यमिक शाळांची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, ज्यामुळे लहान मुलांना शाळेपर्यंत जायला खूप अंतर न भासता नियमितपणे शिक्षण घेता येईल. शाळेचा अभाव किंवा खूप दूर असलेली शाळा हे मुलांच्या शिक्षणात मोठे अडथळे निर्माण करतात.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे दर्जेदार शिक्षण देणे कठीण जाते. यासाठी शिक्षकांची संख्या वाढवणे, त्यांचे प्रशिक्षण देणे, तसेच नियमित निरीक्षण करून शिक्षणाची गुणवत्ता सुनिश्चित करणे गरजेचे आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षक असल्यास मुलांचा शाळेप्रती आवड निर्माण होतो आणि साक्षरतेची गती वाढते.

गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य पुरवणे, सायकल योजना राबवणे, वसतिगृह सुविधा उपलब्ध करणे ह्यामुळे शाळेत नियमित उपस्थिती वाढते. अशा सुविधा मुलांना शाळेत जाण्यास प्रोत्साहित करतात आणि शिक्षणाचा दर्जा सुधारतात.

शाळांमध्ये वाचनालय, संगणक कक्ष, डिजिटल शिक्षण यासारख्या आधुनिक साधनांची उपलब्धता आवश्यक आहे. यामुळे मुलांचा ज्ञानवाढीचा अनुभव समृद्ध होतो, तसेच ते तंत्रज्ञानासोबत जुळवून घेण्यास सक्षम होतात.

शिक्षणाबाबत पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे. जनजागृती मोहिमांद्वारे पालकांना मुलांच्या शिक्षणाचे फायदे समजावून सांगणे, शाळेत नियमित उपस्थितीचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com