CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

भिवपाची गरज ना!, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचं वाक्य पुन्हा चर्चेत

गोव्याच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा नागरिकांना दिलासा

दैनिक गोमन्तक

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत बुधवारी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं नेहमीचं 'भिवपाची गरज ना' हे टॅगलाईन असलेलं वाक्य उच्चारलं. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे.

कोरोना काळातही मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी आपल्या या टॅगलाईनचा वापर केला होता. यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलही केलं गेलं होतं. अनेकदा त्यांच्यावर टीका करण्यात आली होती, तसंच याच वाक्यावर मिम्सही बनवण्यात आले होते. आता अर्थसंकल्पादिवशी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा हे वाक्य बोलल्याने पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या याच टिप्पणीला नेटकऱ्यांनी उचलून धरलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) भिवपाची ना या वाक्याची जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी भिवपाची गरज ना असं सांगत गोव्यातील जनतेला आश्वस्त केलं होतं. विरोधकांनी टीका केल्यानंतरही मुख्यमंत्र्यांना याचा काहीही फरक पडलेला नाही. त्यांनी भिवपाची गरज ना या वाक्याचा पुरेपुर वापर करुन घेतला आहे.

गोवा राज्याचा 2022-23 सालचा अर्थसंकल्प (Budget) सादर करताना मुख्यंमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी भिवपाची गरज ना असा उल्लेख केला. गोवा सरकारने आजपर्यंत आपल्या आश्वासनाला जागत लोकोपयोगी कामं केली आहेत. आणि आम्ही सिद्ध केलं आहे की गोव्यातील लोकांना कोणत्याही गोष्टीपासून घाबरण्याची गरज नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. आपलं 90 मिनिटांचं भाषण संपवताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा भिवपाची गरज ना चा पुनरुच्चार केला. यावेळी गोव्याला स्वयंपूर्ण करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT