CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांनाच एकसमान मानतो, समतोल विकास हाच आमचा ध्यास"; कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

BJP Goa Meeting: भाजप हा शिस्तबद्ध व राष्ट्रहितासाठी कार्य करणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांनी ‘देश प्रथम, पक्ष द्वितीय आणि आपण तृतीय’ हे तत्त्व मनाशी बाळगून कार्य केले पाहिजे, असा संदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : भाजप हा शिस्तबद्ध व राष्ट्रहितासाठी कार्य करणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांनी ‘देश प्रथम, पक्ष द्वितीय आणि आपण तृतीय’ हे तत्त्व मनाशी बाळगून कार्य केले पाहिजे, असा संदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात दिला. ‘स्‍मार्ट सिटी’तील त्रुटी त्‍यांनी तसेच आमदार बाबूश मोन्‍सेरात यांनी मान्‍य केल्‍या.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, स्‍थानिक आमदार बाबूश मोन्सेरात व भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत केंद्र सरकारला पाठिंबा व्यक्त केला.

आम्ही केवळ खुर्चीसाठी नाही तर अखंड भारत घडवण्यासाठी काम करत आहोत. पाकिस्तान जेव्हा भारतात सामील होईल, तेव्हाच हे स्वप्न पूर्ण होईल. मोदींनी काश्मीरचा स्वतंत्र झेंडा काढून ‘एक राष्ट्र, एक झेंडा’ ही किमया साधली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील विकासकामांचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, झुआरी पूल, अटल सेतू, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ ही भाजप सरकारची देणगी आहे. गेल्या बारा वर्षांत ३५ हजार कोटी रुपयांचा विकास झाला आहे. पणजी स्मार्ट सिटीमुळे वाचली, अन्यथा ते खड्ड्यांचे शहर बनले असते. लवकरच आता सांतिनेज नाल्याचे काम देखील हाती घेतले जाणार आहे, असेही मुख्‍यमंत्री म्‍हणाले. तर, तानावडे यांनी सांगितले की, निवडणूक बूथवरच जिंकली जाते. सकाळी उठून बूथ पातळीवर काम केल्यास यश नक्की मिळेल.

भाजप हा कोणत्याही धर्मावरून भेदभाव करत नाही. आम्ही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांनाच एकसमान मानतो. गोव्याचा समतोल विकास हाच आमचा ध्यास आहे. आगामी निवडणूक जिंकण्‍यासाठी कार्यकर्त्यांनी बूथस्तरीत संघटन बांधणी करावी. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

आगामी विधानसभा निवडणुकीत २७हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे. कार्यकर्त्यांनी समस्या आल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा. - बाबूश मोन्सेरात, पणजीचे आमदार

जुने कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक आहेत, तर नवीन कार्यकर्ते चेतना आहे. भाजप हा अंत्योदय तत्त्वावर काम करणारा पक्ष आहे. शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणे हेच ध्येय आहे. - दामू नाईक, भाजप प्रदेशाध्‍यक्ष

खासगी नोकऱ्याही गोमंतकीयांनाच!

मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वांना सरकारी नोकऱ्या देणे शक्य नसले तरी ८० ते ९० टक्के गोमंतकीयांना खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी मजूरमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या सहकार्याने धोरण आखले जात आहे. पुढील दोन वर्षांत १० हजार नोकऱ्या उपलब्‍ध करून देण्‍यात येईल.

बाबूशवर स्‍तुतिसुमनांचा वर्षाव

आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मंदिर स्वच्छतेसारखा उपक्रम हाती घेतला. भाजप संस्कृतीचाच तो एक भाग होता. बाबूशची काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करताना देश आणि पणजीचे भविष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आहे हे ओळखले आणि हेच खरे कार्यकर्त्याचे लक्षण आहे, अशा शब्‍दांत मुख्‍यमंत्र्यांनी बाबूश यांच्‍या कार्याचा गौरव केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT