Goa Traffic | Atal Setu | CM Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic: अटल सेतूचा फोंड्याकडील भाग आज वाहतुकीसाठी खुला करणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

दहावीच्या परिक्षेच्या पार्श्वभुमीवर अटल सेतूची एक बाजू 2 एप्रिलपासून होणार खुली

Akshay Nirmale

Goa Traffic: अटल सेतुवर सुरू असलेल्या कामामुळे या पुलावरून वाहतूक बंद आहे. त्याचा परिणाम पणजीतील वाहतुकीवर झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून पणजीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

यातून वाहनधारक, नागरिक, पर्यटकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत आता अटल सेतुवरील एक भाग आज, शनिवारी (ता. 25) संध्याकाळपासून वाहतुकीसाठी खुला केला जात आहे. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच ही माहिती दिली आहे.

अटल सेतूचा फोंड्याकडील एक भाग आजपासून वाहनधारकांसाठी खुला करण्यात येणार आहे. मेरशी जंक्शन येथे वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्वरीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून म्हापसा रस्त्याची एक बाजू येत्या 5 दिवसात खुली केली जाईल. तर दहावीच्या परिक्षेच्या पार्श्वभुमीवर अटल सेतूची एक बाजू 2 एप्रिलपासून खुली करण्यात येईल, अशीही माहिती देण्यात आली आहे.

अटल सेतुवरील काम सुरू असल्याने तो वाहतुकीसाठी बंद आहे. शिवाय जी-२० बैठकीच्या पार्श्वभुमीवर शहरातील काही रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे. तसेच पणजीमध्ये स्मार्ट सिटीची विविध कामे सुरू आहेत. त्यासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत.

त्यामुळे रस्ते वाहतूकीची पुर्ण फज्जा उडाला आहे. शहरात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. गेल्या पाच दिवसात तर हे प्रमाण खूप वाढले आहे.

नुकतेच वीजमंत्री सुदिन धवळीकर यांनीही या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभुमीवर मंत्र्यांना एक सूचना केली होती. सोमवारपासून सुरू होत असलेल्या गोवा विधानसभेच्या अधिवेशनाला येताना एक ता आधीच यावे, म्हणजे वाहतूक कोंडीत अडकून अधिवेशनात पोहचायला विलंब व्हायला नको, अशी सूचना त्यांनी मंत्र्यांना केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT