CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : ‘उच्च माध्यमिक’चे सर्वेक्षण करणार; 10 किलोमीटरच्या आत आवडीचे शिक्षण उपलब्ध

मुख्यमंत्री : गरज असल्यास माध्यमिक शाळांना ११वी, १२ वीसाठी विद्यालय सुरू करायचे झाल्यास त्यांना सुविधा निर्माण कराव्या लागतील

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात उच्च माध्यमिक विद्यालयांची संख्या पुरेशी आहे. त्यामुळे दहावीत उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावीत सहजपणे प्रवेश मिळतो. १० किलोमीटरच्या आत विद्यार्थ्यांना हव्या त्या शाखेचे शिक्षण मिळते.

तरीही काही अडचण असल्यास ती सोडवली जाईल. त्यासाठी सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांचे सर्वेक्षण करून निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सभागृहात दिली.

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी हा प्रश्न विचारला होता. मुरगावात उच्च माध्यमिक विद्यालयांची संख्या कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दूर सांकवाळ, वेर्णा, दाबोळी येथे अनेक बसेस बदलत १० ते १५ किलोमीटरच्या बाहेर जावे लागते.

त्यांचा प्रवासातच जास्त वेळ जातो. पालकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी मुरगाव मतदारसंघात अन्य माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक शिक्षण सुरू करण्यासाठी परवानगी द्या किंवा वर्ग वाढविणार का? असा प्रश्न आमदार आमोणकर यांनी केला होता.

यासंदर्भात शिक्षण खात्याकडून सर्व विद्यालयांचे सर्वेक्षण केले जाईल. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील उपाय योजले जातील, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

निश्‍चित कारणे शोधा!

मुरगाव आणि वास्को या मतदारसंघांत अनुदानित ७, सरकारी ९ आणि विनाअनुदानित १ अशी उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. ही सर्व १० किलोमीटरच्या आत येतात. पण, काही विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, तर काही विद्यालयांमध्ये संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे.

याचे कारण आमदारांनी शोधून उपाय योजावा. गरज असल्यास माध्यमिक शाळांना ११वी, १२ वीसाठी विद्यालय सुरू करायचे झाल्यास त्यांना सुविधा निर्माण कराव्या लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आयटीआय झालेल्यांना डिप्लोमा

दहावीनंतर सर्वांनीच कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची आता गरज नाही. सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य विकासावर भर दिला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश घेता येतो.

तिथे दोन वर्षे कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्याला थेट डिप्लोमाच्या पुढील वर्गासाठी प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचाही विद्यार्थ्यांना फायदा होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भाईचा ऑरॉच खतरनाक! गळ्यातील नोटांच्या लांबलचक माळेने वेधले लक्ष, व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'हा तर अंबानींचा नातेवाईक दिसतोय...'

Manuel Frederick Passes Away: क्रीडा विश्वात हळहळ! भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू मॅन्युएल फ्रेडरिक यांचे निधन, 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa TET 2025: सुवर्णसंधी! शिक्षक होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, गोवा 'टीईटी'चे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Ola Electric Sales Goa: ओला कंपनीला मोठा झटका; गोव्यात इलेक्ट्रिक बाईकची विक्री थांबवली

Mohammad Azharuddin: क्रिकेटचा कॅप्टन आता राज्याचा मंत्री! मोहम्मद अझरुद्दीन यांची तेलंगणा मंत्रिमंडळात नवी इनिंग

SCROLL FOR NEXT