CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: 'हे पद लोकांच्या कल्याणासाठी, मी लोकांचा मुख्यसेवक'! मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन; Viral Video

CM Pramod Sawant: सर्वप्रथम जनतेचा ‘मुख्यसेवक’ आहे, हे ध्यानात ठेवून वागतो व लोकांची कामे करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवनात केले.

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी: सरकारी कर्मचारी हे वास्तविक जनतेचे सेवक असतात. आपल्याकडे कामासाठी येणाऱ्या लोकांशी सोज्वळ व नम्रतेने वागल्यास लोकांकडूनही आपणास चांगली वागणूक मिळते. आपण जरी मुख्यमंत्री असलो तरी आपले कर्तव्य हे लोकांची कामे करणे आहे.

हे पद लोकांच्या कल्याणासाठी असून आपण स्वतःला मुख्यमंत्री असे मानत असताना सर्वप्रथम जनतेचा ‘मुख्यसेवक’ आहे, हे ध्यानात ठेवून वागतो व लोकांची कामे करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवनात केले.

साखळी रवींद्र भवन येथे शासकीय कर्मचारी सांस्कृतिक मंचतर्फे कला व संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्य पातळीवरील पाचव्या कला सृजनोत्सव २०२५ या कार्यक्रमाच्या उद्‌घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी कला व संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक, शासकीय कर्मचारी सांस्कृतिक मंचच्या अध्यक्षा बिंदीया वस्त, निवृत्त सदस्य सचिव स्वाती दळवी व इतरांची उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून या कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. दोन दिवस चालणाऱ्या या ‘कला सृजनोत्सव’ कार्यक्रमात गोवाभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विविध कला व सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा होणार आहेत. सुमारे १,२०० सरकारी कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT