CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : राज्‍य सरकार अंमलीपदार्थाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरणाच्या वचनबद्धतेवर ठाम

ड्रग्जप्रकरणांचा तपास जलदगतीने; गुन्ह्यांत घट

दैनिक गोमन्तक

Panaji : ड्रग्जविक्रेते व दलालांना लक्ष्य करून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत सरकार ठाम आहे. राज्यात ड्रग्‍ज तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असल्यानेच गुन्ह्यांचे प्रमाण यावर्षी कमी झाले आहे.

राज्‍य सरकार अंमलीपदार्थाविरुद्ध शून्य सहिष्णुता (झिरो टोलरन्स) धोरणाच्या वचनबद्धतेवर ठाम आहे. नशामुक्त समाज घडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थविरोधी दिवसानिमित्त बोलताना केले.

राज्यात दरवर्षी दिडशेच्या आसपास ड्रग्जसंदर्भातील गुन्हे नोंद होऊन कोट्यवधी अंमलीपदार्थांचा साठा जप्त केला जातो. या ड्रग्जव्यवसायात परप्रांतीय व विदेशी नागरिकांव्यतिरिक्त गोमंतकीयही सामील होऊ लागले आहेत. ड्रग्जव्यवसाय हा किनारपट्टी परिसरापुरताच मर्यादित राहिला नसून तो आता अंतर्गत ग्रामीण भागातही पोहोचला आहे.

ड्रग्जविक्रेते व दलाल या व्यवसायात विद्यार्थ्यांना झटपट पैशांचे आमिष दाखवून ओढताहेत. त्‍यामुळे ते व्यसनी बनत आहेत. हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्‍ये काम करणारे कर्मचारीही ड्रग्ज व्यवसायात मिळणाऱ्या कमिशनमुळे बळी पडत आहेत.

सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणात तिच्या साथीदारांनी हॉटलेमधील कर्मचाऱ्याकडूनच ड्रग्ज मिळवले होते. ही ड्रग्जची साखळी राज्यात दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच आहे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले. दरम्‍यान, २०२१ मध्ये १२१ तर २०२२ मध्ये ड्रग्‍ससंबंधी १५५ वर गुन्‍हे नोंद झाले. यावर्षी तर गेल्या पाच महिन्यांत ७० गुन्हे दाखल झालेले आहेत.

ताळगाव ते पणजी दौड

गोवा अंमलीपदार्थविरोधी कक्षातर्फे आज बांबोळी येथील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्‍टेडियम ते पणजी फेरीधक्का अशी दौड आयोजित करण्यात आली होती. ‘ड्रग्जला नाही म्हणा’ असा संदेश यामधून देण्यात आला. पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्यासह काही पोलिस तसेच नागरिक त्‍यात सहभागी झाले होते. दरम्‍यान, आजच्या युवा पिढीने ड्रग्जपासून दूर राहावे. एखादी व्यक्ती ड्रग्ज व्यवसायात असल्याची माहिती मिळाल्यास त्‍वरित पोलिसांना कल्‍पना द्यावी असे आवाहन अधीक्षक वाल्सन यांनी केले.

ड्रग्जमध्ये 16 देशांचे नागरिक

अंमलीपदार्थप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकांमध्ये नायजेरियनांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या अडीच वर्षात ६१ विदेशी नागरिकांना अटक झाली. त्यात ३१ नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ रशियन नागरिकांना (७) अटक झाली आहे. यामध्ये आयवोरियन, गुनिया, नेपाळ, युक्रेन, ऑस्ट्रिया, युगांडा, जपान, बेलारूस, नेदरलँड, लिबेरिया, टांझानिया, अमेरिका, युके, फ्रान्स या देशांच्या नागरिकांचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT