Discarded Fishing Nets on Beaches: सुंदर समुद्रकिनाऱ्यांनी वेढलेल्या आपल्या राज्यात अनेकदा कचरा ही समस्या डोकं वर काढू पाहते.
समुद्रकिनाऱ्यांवर अनेकदा घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते. यामध्ये मासेमारांच्या जुन्या जाळ्यांचाही समावेश असतो. सध्या गोव्यातील किनाऱ्यांवर मासेमारांतर्फे टाकण्यात आलेल्या जाळ्यांची सफाई करण्याचे काम सुरू आहे.
मासेमारांनी फेकून दिलेल्या जाळ्यांनी सफाई करण्यासाठी द एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (TERI) लवकरच एक पायलट प्रोजेक्ट सुरू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या राज्यात टाकून दिलेली मासेमारीची जाळी गोळा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही.
माहितीनुसार, 2020-21 मध्ये मच्छिमारांकडून 240 विविध प्रकारची जाळी वापरण्यात आली असून अंदाजे 21,000 किलो जाळी टाकून देण्यात आली असल्याचे TERI च्या सहकारी डॉ. अश्विनी पै पाणंदीकर यांनी सांगितले.
मात्र या फेकून दिलेल्या जाळ्यांचा पूनर्वापर केला जाऊ शकतो. पाणंदीकर यांच्या मते कचरा गोळा करण्यासाठी जुन्या मासेमारीच्या जाळ्यांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. कारण ते कृत्रिम फायबरचे बनलेले आहेत आणि त्यामुळे नॉन-बायोडिग्रेडेबल आहेत.
मच्छिमार दर दोन वर्षांनी नवीन मासेमारीची जाळी घेतात. पण यामुळे साठवणुकीची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे मासेमार न वापरलेली जुनी जाळी समुद्रकिनाऱ्यावर, जेटी आणि मासे लँडिंग साइटवरच टाकून देतात, असे निदर्शनास आल्याचे पाणंदीकर म्हणाल्या.
हे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (GSPCB) सहकार्याने एक व्यवसाय मॉडेल तयार करण्यात येणार असून यामध्ये मच्छिमारांना नियुक्त केलेल्या ठिकाणी जाळे टाकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
इतर राज्यांमध्येही ही समस्या असून, टाकून दिलेली मासेमारीची जाळी भंगार विक्रेत्यांद्वारे गोळा केली जात आहेत आणि पुण्यातील एका कंपनीकडे पाठवली जात आहेत.
यांचा वापर करून सर्फबोर्ड बनवण्यात येत आहे. असाच वापर गोव्यातही लागू केला जाऊ शकतो, असे मत TERIतर्फे व्यक्त करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.