CM Pramod Sawant, Amal Mahadik  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर; ठाकरेंवर जोरदार टीका करून महायुतीच्या प्रचाराची सुरवात

Assembly Elections Maharashtra: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापूर, सांगली दौऱ्यास आज सुरवात केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौऱ्याची सुरवात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करून केली.

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant Kolhapur Sangli Visit For Assembly Elections Maharashtra

कोल्हापूर/पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापूर, सांगली दौऱ्यास आज सुरवात केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौऱ्याची सुरवात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करून केली. कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होण्यास मोठी संधी असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी भारतीय जनता पक्षाने स्टार प्रचारकांची फौज निवडणूक रिंगणात उतरवली आहे. यामध्ये मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचाही समावेश आहे. कोल्हापूर येथे पोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे उमेदवार राजेश क्षीरसागर व कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक यांनी त्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी सात वाजता कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील काँग्रेस महाआघाडीवर टीका केली. कोल्हापूर जिल्ह्याला सक्षम आणि कुशल नेतृत्व मिळाले नसल्यानेच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास खुंटला असा आरोप त्यांनी केला.

कोल्हापूरसह संपूर्ण राज्याचा दुप्पट वेगाने विकास आणि प्रगती होण्यासाठी या निवडणुकीत महायुतीला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले. उद्धव ठाकरे यांच्या काळात तर महाराष्ट्रात कोणतीही विकासकामे झालेली नाहीत, अशी टीका त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी उद्योग, व्यापार वृद्धी मेळावा तसेच समाज माध्यमे प्रभाव व्यक्तींसोबत संवाद साधला. मुख्यमंत्री सांगली जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT