Goa Flashback 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Flashback 2022: 'या' घटनांमुळे गोवा वर्षभर चर्चेत राहिला, जाणून घ्या सविस्तर

गोव्यातील महिलांची सुरक्षा, अमली पदार्थ तस्करी आणि गोवा पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले.

Pramod Yadav

गोव्यासाठी 2022 हे वर्षे विविध घटनांमुळे चर्चेत राहिले. सोनाली फोगट हत्या प्रकरणामुळे गोव्यातील महिलांची सुरक्षा, अमली पदार्थ तस्करी आणि गोवा पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले. याशिवाय वर्षेभरात घडलेल्या अपघातात झुआरीच्या अपघाताने देखील राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. (Major Incidents happened in Goa in 2022) चला तर जाणून घेऊया गोव्यात 2022 वर्षात घेडलेल्या काही महत्वाच्या आणि मोठ्या घटना ज्यामुळे गोवा वर्षभर चर्चेत राहिला.

डॉ. प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ (Goa Election 2022)

माजी केंद्रीय संरक्षणमंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी अकाळी निधन झाल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तीनवर्षे राज्य कारभार केल्यानंतर 2022 मध्ये गोवा विधानसभेची निवडणूक लागली. अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले पण, बहूमत गाठता आले नाही. वीस जागांवर आघाडी मिळालेल्या भाजपने मगो पक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन केले.

सध्या राज्य सरकारमध्ये आरोग्य आणि वन खात्याचे मंत्री असणारे विश्वजीत राणे गोव्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा जोर धरत असताना डॉ. प्रमोद सांवत यांनी 28 मार्च 2022 रोजी दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सात राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. 18 मिनिटांच्या शपथविधीसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून 5.5 कोटी रूपये खर्च केल्याची माहिती त्यानंतर समोर आली होती.

सोनाली फोगट हत्या प्रकरण (Sonali Phogat Murder Case)

गोव्यात वर्षभरातील सर्वात मोठी आणि हादरवून टाकणारी घटना म्हणजे टिकटॉक स्टार आणि हरियाणा येथील भाजप नेत्या सोनाली फोगट यांची हत्या. फोगट यांचा 23 ऑगस्ट 2022 रोजी गोव्यातील हणजूणे येथे संशयास्पद मृत्यू झाला. ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे फोगट यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करणाऱ्या गोवा पोलिस आणि सरकारला सोनाली यांच्या भावाने तक्रार केल्यानंतर हे प्रकरण गंभीर घ्यावे लागले. पुढे या प्रकरणात सोनाली फोगट यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान आणि सुखविंदर पाल सिंग यांना अटक करण्यात आले.

ज्या कर्लिस बारमध्ये ही घटना घडली त्याचा कथित मालक एडविन नुनिस आणि तेथील ड्रग पेडलर रामदास मांद्रेकर आणि दत्तप्रसाद गावकर हे चर्चेत आले व त्यांना देखील अटक करून जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, गोवा पोलिस योग्य पद्धतीने तपास करत नसल्याचे वारंवार आरोप झाल्यानंतर याचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला व सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

आठ काँग्रेस आमदारांचे सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश (Eight Congress MLA Defection)

मार्चमध्ये गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. त्यानंतर जुलैमध्ये होणाऱ्या पहिल्या विधानसभा अधिवेशनापूर्वी काँग्रेसचे जेष्ठ नेते व आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो यांच्यासह आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न फसला. त्यानंतर मात्र 14 सप्टेंबर रोजी आठ आमदरांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन भाजप प्रवेश नश्चित केला. यावेळी देवाने सांगितल्यामुळे मी काँग्रेस सोडली असे दिगंबर कामत यांनी केलेले वक्तव्य गल्ली पासून दिल्लीपर्यंत गाजले. दरम्यान, आठ आमदारांच्या जुलै मधील पक्षांतराचा प्रयत्न आणि सप्टेंबरमधील पक्षांतर यावरून अशा दोन अपात्रता याचिका काँग्रेसकडून दाखल करण्यात आल्या आहेत.

53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, गोवा (IFFI Goa 2022)

कोरोनाच्या संकटानंतर 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, गोव्यात पार पडला. 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या या चित्रपट महोत्सवात पाचशेहून अधिक देशी-विदेशी चित्रपट दाखवण्यात आले. पण, हा चित्रपट महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडला तो वादग्रस्त काश्मिर फाईल्स हा चित्रपट आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांच्या वक्तव्यामुळे. इफ्फीत ज्युरी अध्यक्ष, इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स'ला 'वल्गर आणि प्रोपेगेंडा' म्हणून संबोधले केले आणि मोठा वाद झाला. याचे भारतासह इस्रायलमध्ये देखील पडसाद उमटले. त्यानंतर बराचकाळ माफीनाट्य देखील रंगले.

मोपा (मनोहर) आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आयुष हॉस्पिटल (Mopa Airport And Ayush Medical College)

गोव्यासाठी अतिशय महत्वाचे मानले जाणाऱ्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले. याचवेळी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नामकरणाच्या वादावर देखील पडदा पडला. मोपाचे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी नवी ओळख असेल अशी अधिकृत घोषणा नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. येत्या पाच जानेवारीपासून नवे विमानतळ कार्यरत होणार आहे. या विमानतळाची वर्षाला 44 लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल.

याशिवाय याच दिवशी गोव्यात नव्याने उभारण्यात आलेल्या आयुष वैद्यकीय महाविद्यालयाचे देखील उद्घाटन करण्यात आले. यामहाविद्यालयात 50 टक्के जागा गोमन्तकीयांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, यामुळे मोठा रोजगार देखील उपलब्ध होणार आहे.

याशिवाय झुआरी नदीवरील अपघात, सारा खान अमलीपदार्थ प्रकरण, मुरगाव येथे अमेरिकन पर्यटकांसोबत झालेला गैरप्रकार हे देखील चर्चेत राहिले. तसेच, गोव्याच्या बुद्धीबळपटू भक्ती कुलकर्णी यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT